चलो मुंबई, चलो मुंबई भटक्या विमुक्तांच्या बेरोजगारसाठी मुंबईत आंदोलन. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे भटका व विमुक्त समाजतील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे . तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा , यासाठी महाराष्ट्र सरकार कोणतेही प्रयत्न करत नाही . या विरोधात भटका विमुक्त संघर्ष समितीच्या माध्यमातून मंत्रालय , राजभवन , समोर तसेच रेल रोको आंदोलन 26 ऑक्टोबर रोजी पासून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे , त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील तमाम भटक्या विमुक्त समाजातील बेरोजगार तरुण बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण या रोजगाराच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .