भैरव क्रांती सेना व संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले.
पुणे – सेवा हीच ओळख” या तत्वावर काम करणाऱ्या भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये सर्वप्रथम भैरव क्रांती सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ओळख करून देण्यात आली, तसेच संघटनेचे सामाजिक कार्य आणि जनतेशी असलेले नाते अधोरेखित करण्यात आले. यानंतर भटक्या-विमुक्त समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेसाठी रेणके आयोगाचे माजी केंद्रीय अध्यक्ष श्री. बालकृष्ण रेणके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (VJNT विभाग) अध्यक्षा अॅड. पल्लवीताई रेणके, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शिवनाथ शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भैरव क्रांती सेना व संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव साहेब यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात भटक्या-विमुक्त समाजाच्या प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. या शिबिरामध्ये शासनाच्या विविध कल्याणकारी योजना भटक्या-विमुक्त समाजापर्यंत प्रभावीपणे कशा पोहोचतील, याबाबत कायदेशीर मार्गदर्शन देण्यात आले. शास...