मुबंईत सर्वत्र जुगाराचे अड्डे बंद… मग शाहूनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीतच कसे सुरु ? मुंबई पोलीस आयुक्त यांना सवाल..? Mumbai News
मुबंईत सर्वत्र जुगाराचे अड्डे बंद… मग शाहूनगर पोलीस ठाणे यांच्या हद्दीतच कसे सुरु ? मुंबई पोलीस आयुक्त यांना सवाल..? मुंबई विशेष प्रतिनिधी:- सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार लॉकडाऊन संपल्यानंतर काही गुन्हेगारी प्रवृतीच्या लोकांनी परत शासन आणि पोलिसांचे सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे जगाराचे अड्डे सुरु केलेले आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात पोलिसांनी थेट कारवाही करत जुगाराचे अड्डे बंद केलेले असताना शाहूनगर पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन 90 फीट रोड,कामराज मेमोरीयल हायस्कूल जवळ आणि राधा मेडिकलच्या समोर, नेहरू चाळ, लक्ष्मी चाळ, लेबर कंपाउंड मध्ये रोज ठिकाण बदलून जुगाराचे अड्डे सुरु आहेत.भूमिपुत्राना आणि माध्यमावर्गी यांना देशोधडीला लावणाऱ्या या जुगाराच्या अड्डयावर शाहूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाई करण्यास का कचरात आहे ? हा सवाल सध्या मुंबईतील जनतेस पडला आहे. शाहूनगर पोलीस ठाणे, मुंबई यांचे कामगिरीवर प्रश्न चिंन्ह उभा राहिलेले आहे. या अनुषंगाने पुन्हा मुंबई पोलीस यांचे कामगिरीवर प्रश्न चिन्ह उभा राहिले आहे. सर्वत्र मुंबईत जुगाराचे अड्डे बंद असता...