मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी २०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!एसटी संपाबाबत आता शुक्रवारी उच्‍च न्‍यायालयात सुनावणी! Maharashtra News

  दहावी, बारावी परीक्षेसंदर्भातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दहावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा फिजिकल पध्दतीने घेतल्या जाऊ नयेत, अशा विनंती करणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी (दि.२३) सुनावणी होणार आहे. देशातील पंधरापेक्षा जास्त राज्यांची परीक्षा मंडळे, आयसीएससी तसेच सीबीएससी मंडळाकडून फिजिकल पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी सुरु आहे, पण कोरोना संकटामुळे परीक्षा फिजिकल पध्दतीने घेऊ नयेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील याचिकांवर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सुनावणी घेणार आहे. आगामी बोर्ड परीक्षेसाठी वैकल्पिक मूल्यांकन पद्धतीचा अवलंब करावा, अशी विनंती याचिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केली आहे. गतवर्षी सीबीएसईसहित इतर मंडळे व राज्य मंडळांनी वैकल्पिक मूल्यांकन करून विद्यार्थ्यांचा निकाल दिला होता. याचिकेच्या प्रती सीबीएसई बोर्डाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. एसटी संपाबाबत आता शुक्रवारी उच्‍च न्‍यायालयात सुनावणी एसटीविलनीकरणाबाबत अद्‍याप कोणताही निर्णय घेतला ना...

कोल्हापूर ठळक बातम्या 20-02-2022 Kolhapur breaking News!

👉‘पंचगंगे’त मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर 📌कचरा, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रांमधील रासायनिक पाणी थेट नदीपात्रामध्ये सोडले जात असल्याने पंचगंगा नदी अक्षरश: प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. त्याचवेळी काही लोक मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करत असल्याने नदीपात्रातील जलचरांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ब्लिचिंग पावडरच्या साहाय्याने केलेली मासेमारी खवय्यांच्या आरोग्याच्या द‍ृष्टीने धोकादायक आहे. झटपट मासेमारी करण्यासाठी नदीच्या पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकून मासेमारी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. काही लोक सायंकाळी मासे मारण्यासाठी येतात. त्यावेळी ते जाळे लावण्याआधी ब्लिचिंग पावडर पाण्यात टाकत असल्याचे नदीकाठच्या शेतकर्‍यांनी सांगितले; तर नदीत पावडर टाकून मासे मारले जात असल्याचे रंकाळा तलावामध्ये मासेमारी करणार्‍या काहींनी सांगितले. काही लोकांकडून होत असलेल्या ब्लिचिंग पावडरच्या वापराचा फटका पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे. 👉किल्‍ले पन्हाळगडावर शाही थाटात शिवजन्मोत्सव सोहळा. ‘जय भवानी... जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमला गड 📌किल्‍ले पन्हाळगडावर छत्रपती ताराराणी महाराज यांच्या राजवा...