मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर ३१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री दिलीप मनोहर भांबुरे राहणार सासवड यांची निवारा बालगृहस मदत

श्री दिलीप मनोहर भांबुरे यांनी दीपावलीनिमित्त देणगी स्वरुपात मदत केली.ही मदत संकलन प्रतिनिधी आकाश बापू शिंदे व सहकारी यांच्याकडे जमा केली. श्री दिलीप मनोहर भांबुरे यांना निवारा बालगृह तर्फे     दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आमच्या निवारा बालगृहस आपण मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

साप्ताहिक ठिणगी च्या दिवाळी अंकाचे पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते थाटात प्रकाशन.

  साप्ताहिक ठिणगी च्या दिवाळी अंकाचे पोलीस उपअधीक्षक यांच्या हस्ते थाटात प्रकाशन सोलापूर ( प्रतिनिधी )- पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व साप्ताहिक ठिणगी चे संपादक रामचंद्र सरवदे यांच्या साप्ताहिक ठिणगी च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पोलीस उपअधीक्षक श्री सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालय ( ग्रामीण ) येथे थाटात प्रकाशन करण्यात आले यावेळी पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी समस्त पत्रकारांना दीपावली शुभेच्छा दिल्या यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी अक्षय बबलाद सिद्धार्थ भडकुंबे राम हुंडारे नागनाथ गणपा श्रीनिवास वंगा इम्तियाज अक्कलकोटकर इस्माईल शेख रोहित घोडके सूर्यकांत व्हनकडे मोहम्मद इंडिकर सतीश गडकरी इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

जुन्या कटु आठवणी दीपावली विशेष खास कविता

जुन्या कटु आठवणी दीपावली विशेष खास कविता                  *कोरोना आणि दिवाळी*   आनंदाची मुक्तहस्त पणे उधळण करते ही दिवाळी आणि जुन्या कोरोना च्या आठवणीने डोळ्यात येते रोज रोज सकाळी पाणी.  ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी पण दोन वर्ष झाली आमचे कोरूना च्या काळोखातच गेली दिवाळी. कोरोना येण्याआधी चे जुने गेले-ते-दिवस-राहील्या-त्या-फक्त-आठवणी आणि जुन्या आठवणी किती ठेवणार हो मनात साठवून.   कोरोनाने कितीतरी घराला लावले आहेत टाळे   प्रत्येक घराघरात पसरले आहे कोरोना चे जाळे.  आणि कोरोनाच्या भीतीने लोकांनी मिटले हो डोळे. जो तो झालाय मोदीचा भक्त  पण गरीबच मेलाय घरातच फक्त आणि गरिबाचं रस्त्यावर कायम सांडल आहे रक्त. मोठ्या लोकांना कोरोना झाला तर  त्यांची बातमी येते न्यूज चैनल वर आणि गोरगरीब मेले रस्त्यावर  त्यांची बातमी का येत नाही वृत्तपत्रावर. कोरोनाच्या महामारी रोगाणि लोक झाले  आहेत फार त्रस्त या रोगामुळे डॉक्टर लोकांचा धंदा चाललाय फार मस्त म्हणून लोकांचे जीव मात्र झाले आहेत स्वस्त पण कोरूना पेक्...

सोलापूर पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले

सोलापूर:-(प्रतिनिधी ), विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बार निर्बंध असतानाही सुरू राहिला कसा आणि त्याची माहिती तुम्हाला का नव्हती, असा जाब विचारत पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यावर ठोस कारवाई करत त्यांना थेट निलंबितच केले आहे. तर डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्यासह आठ जणांना मुख्यालयात आणले आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदयसिंह पाटील व डीबी पथकाचे प्रमुख शीतलकुमार कोल्हाळ यांची पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाला तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यात डीबी पथकातील राजकुमार तोळनुरे, श्रीरंग खांडेकर, पिंटू जाधव, शिवानंद भीमदे, अंबादास गड्डम, अतिश पाटील, इम्रान जमादार व राठोड या आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अचानक केलेल्या तडकाफडकी बदल्यांमुळे शहर पोलिस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. 30 ऑक्‍टोबर रोजी रात्री विजापूर रोडवरील नागेश डान्स बारवर सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी कारवाई केली होती. त्यात जवळपास 39 जणांवर कारवाई क...

दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे

दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे सार्वजनिक जीवनात काम करत असताना निरपेक्ष अन निस्वार्थी पणे काम करत असताना तसेच कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करत असताना अनेक अडचण येतात असतात कधी अभिनंदन चा वर्षाव होतो तर कधी प्रखर टीका त्यात प्रचंड भीती असते ती बदनामी ची गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या उन्नती साठी प्रगती साठी तसेच शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता केवळ पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कौटुंबिक जीवन पणाला लावून व भौतिक सुखाचा त्याग करून पत्रकारांच्या प्रश्नावर कुटुंब बाजूला सारून वारंवार आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करतोय इतकंचं काय अनेक वेळा थेट पोलीस ठाण्यात देखील जाऊन पत्रकारांच्या अडचणी सोडवल्या आहेत अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन वरिष्ठाकडे, मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री मुख्यसचिव  व थेट मंत्रालयात तक्रारी केल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच चौकशी लागल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत त्याच बरोबर पत्रकारांच्या अडचणीत अनेक अधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली आहे त्यामुळे पत्रकारांचे नेतृत्व ...