दारू आणि स्टेअरिंगची जोडी धोकादायक आता पुणे पोलिस करणार कठोर कारवाई काल्पनिक प्रतिमा पुणे : दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी वाहतूक शाखेकडून अत्याधुनिक वेब-आधारित ‘स्मार्ट ब्रीथ अॅनालायझर’ यंत्रणा वापरात आणली जाणार आहे. या यंत्राद्वारे वाहनचालकाने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची तपासणी केली जाईल आणि त्याचा अहवाल थेट पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडला जाईल. त्यामुळे तपासणीची प्रक्रिया पारदर्शक, अचूक आणि जलद होणार आहे. सुरुवातीला १० स्मार्ट यंत्रांची नेमणूक करण्यात आली असून पुढील काळात त्यात वाढ होणार आहे. यंत्रांद्वारे मिळालेली माहिती थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पोहोचणार असल्याने कारवाई टाळणे शक्य राहणार नाही. वाहतुकीत शिस्त राखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी या उपक्रमाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. संपादक – जागरूक लोकमत समाचार