मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १०, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्राह्मणी येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक उपक्रम

🌿 स्वातंत्र्यदिनानिमित्त सामाजिक उपक्रम 🌿 (प्रतिनिधी) | 15 ऑगस्ट 2025 छत्रपती राजर्षी शाहू महाराज निवासी वस्तीगृहातील स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रम. भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती राजर्षी शाहू महाराज निवासी वस्तीगृह, ब्राह्मणी येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांतील सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी अनाथ, निराधार व उपेक्षित समाजघटकातील लहान मुलांना खाऊ वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करून समाजबंधूत्वाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमातील मान्यवर एल.सी.बी. विभागातील पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे बाबा भाऊ शिंदे दयानंद सावंत सर अरुणजी चव्हाण पिराजी शिंदे आर्मी ऑफिसर पवार साहेब सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आणि...

भटक्या समाजातील युवकाचा उपचाराअभावी मृत्यू जय भैरवनाथ क्रांती सेनेचे आंदोलन

जागरूक लोकमत समाचार DM पुणे प्रतिनिधी   पुणे प्रतिनिधी – भटक्या समाजातील कै अशोक पवार यांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये घडली पैशाअभावी त्यांच्या उपचारात अडथळे आणले गेले असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे भरती केलेल्या अशोक पवार यांना आयसीयू मधून बाहेर काढण्यात आले त्यांच्या आईने डॉक्टरांच्या पाया पडून आमची माणसं पैसे आणायला गेलीत कुणीतरी मदत करेल पण तुम्ही उपचार थांबवू नका अशी विनंती केली होती मात्र हॉस्पिटल प्रशासनाने ती विनंती फेटाळून लावत उपचार थांबवले यावेळी अशोक पवार यांना पायऱ्यांवर चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले आणि नंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून मागे वृद्ध आई पत्नी आणि नुकतीच जन्मलेली मुलगी आहे या संतापजनक घटनेविरोधात जय भैरवनाथ सेवाभावी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सुदामराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली भारती हॉस्पिटलसमोर आंदोलन करण्यात आले ...

भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन : मंत्रालय, विधानभवन आणि परिसर तिरंगा रोषणाईने उजळला

मुंबई | १५ ऑगस्ट २०२५ भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईतील मंत्रालय, विधानभवन आणि परिसरातील अनेक इमारती तिरंगा रोषणाईने उजळल्या. या प्रकाशयोजनेमुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. मंत्रालय इमारतीवर झळकणारा भगवा, पांढरा आणि हिरवा रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. विधानभवनासह इतर शासकीय इमारतींनाही हीच तिरंगी सजावट करण्यात आली होती. नागरिकांनी या रोषणाईचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. संध्याकाळी झालेल्या या प्रकाशयोजनेला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती लाभली. देशभक्तीपर गाणी, घोषवाक्ये आणि तिरंगा पताका फडकवून वातावरण आणखीनच उत्साही झाले. ✍ संपादक: जागरुक लोकमत समाचार डिजिटल मीडिया

कराड दक्षिण: बोगस नोंदींविरोधात गणेश पवार यांचे बेमुदत उपोषण

फोटो: जागरूक लोकमत समाचार कराड दक्षिणेत बोगस मतदार यादीविरोधात बेमुदत उपोषण सुरू सातारा | दिनांक: 14 ऑगस्ट 2025 कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात बोगस नोंदींचा आरोप होत असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आजपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. मतदार यादीत बनावट नावे व चुकीची माहिती समाविष्ट असल्याचा आरोप त्यांनी केला असून, याबाबत दोन दिवसांपूर्वी प्रशासनाला लेखी मागणी केली होती. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला. उपोषण कराड शहरातील महत्त्वाच्या चौकात सुरु असून, पवार यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती दर्शवली आहे. आंदोलन स्थळी प्रशासनाने सुरक्षा तैनात केली आहे. पवार यांनी स्पष्ट केले की, "मतदार यादीत बोगस नोंदी राहिल्यास लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होईल. त्यामुळे तातडीने तपास होणे आवश्यक आहे." आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत: मतदार यादीतील सर्व नावे पुन्हा तपासून बोगस नावे वगळावीत. एकाच व्...

पुण्यातील चंदननगरमध्ये महिलेला छेडल्याच्या कारणावरून युवकाची हत्या

  पुणे – चंदननगर परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका ३५ वर्षीय युवकाने स्थानिक महिलेला छेडले, यावर संतप्त झालेल्या तिच्या कुटुंबीयांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने या प्रकरणात हिंसक वागणूक दाखवली. या संघर्षात युवकाला गंभीर मारहाण झाली आणि तो जागेवरच ठार झाला. घटना उघडकीस आल्यावर पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत पोलिसांना कुटुंबीयांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी पोलीस आवश्यक तपास करीत आहेत. संपादक-जागरूक लोकमत समाचार 

फेसबुकवरील ‘तुमचा डेटा फोटो परवानगी’ फेक मेसेज – सावधान

बनावट संदेश अलर्ट  पुणे – सोशल मीडियावर पुन्हा एकदा फसवणुकीचे सत्र सुरु झाले असून, फेसबुकवर अनेक नागरिकांना बनावट (फेक) मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये नोकरी, लॉटरी, बक्षिसे किंवा बँक खात्याच्या अपडेटच्या नावाखाली लिंक पाठवून नागरिकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. 📢 पोलिसांचा इशारा: अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नये, OTP, बँक डिटेल्स किंवा आधार क्रमांक देऊ नये. सायबर क्राईम विभागाने सांगितले आहे की, या मेसेजद्वारे लोकांचे फेसबुक अकाउंट हॅक करून त्याचा गैरवापर केला जातो. काही वेळा पीडितांच्या मित्र-परिवाराला पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवले जातात. फेक मेसेजची काही उदाहरणे: “तुम्ही ₹10 लाखांची लॉटरी जिंकली आहे. त्वरित लिंकवर क्लिक करा.” “तुमचे फेसबुक अकाउंट बंद होणार आहे. कृपया लगेच लॉगिन करा.” “तुमचे बँक खाते ब्लॉक झाले आहे, KYC अपडेट करा.” “तुमचा डेटा आणि फोटो वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तपासा.” तज्ञांचे म्हणणे आहे की, 'तुमचा डेटा ...

अनाथांच्या आयुष्यात आशेचा किरण श्री काशीनाथ गंगाराम चौगुले

काशीनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार घोडेगाव, नगर जिल्हा काशीनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार अनाथ, निराधार आणि वंचित मुलांसाठी निस्वार्थ कार्याची गौरवशाली दखल नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथील वसतिगृहात मुलांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवणारे आणि त्यांच्या भविष्याला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे काशीनाथ गंगाराम चौगुले. महात्मा फुले बालसंगोपन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष म्हणून चौगुले यांनी पन्नासहून अधिक निराधार मुलांना घर आणि कुटुंबाचा आधार दिला आहे. येथे फक्त पोटापाण्याची व्यवस्था नाही; तर उत्तम शिक्षण, चांगले संस्कार आणि आत्मविश्वास देणे हेच ध्येय आहे. व्यक्तिमत्त्व विकासासाठी येथे क्रीडा, संस्कार वर्ग आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे घेतले जातात. चौगुले यांच्यासाठी हे काम कर्तव्य नसून त्यांचा श्वास आहे. “हा सन्मान माझा नाही, तर या मुलांचा आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि हसू हेच माझं खरं बक्षीस आहे.” — काशीनाथ गंगाराम चौगुले त्यांच्या या समर्पि...

देवस्थानच्या जमिनीवर अतिक्रमण विश्वस्तांना धमक्या

जागरुक लोकमत समाचार — डिजिटल मीडिया दि. 11 ऑगस्ट 2025 · आटपाडी/प्रतिनिधी विभाग: स्थानिक बातमी दिघंची (ता. आटपाडी) दिघंची (ता. आटपाडी) येथील श्रीनाथ देवस्थानच्या गट क्रमांक १६१३ मधील जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याची तक्रार देवस्थानचे विश्वस्त डॉ. कालिदास शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. डॉ. शिंदे यांच्या मते, ५ ऑगस्ट रोजी बळीराम रणदिवे, संभाजी साठे आणि ताई साठे यांनी जेसीबीच्या साहाय्याने देवस्थानच्या १७ एकर क्षेत्रातील काही भागात अतिक्रमण करून घराच्या बांधकामास सुरुवात केली. सदर जमीन देवस्थान ट्रस्टच्या मालकीची असून तिची देखरेख करण्यासाठी नियुक्त विश्वस्त आणि प्रशासनिक अधिकारी आहेत. अतिक्रमणाचे चित्रीकरण करत असताना बळीराम रणदिवे आणि संभाजी साठे यांनी शिवीगाळ करत शारीरिक धाक दाखवला तसेच अट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. डॉ. शिंदे यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अतिक्रमण थांबवण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची प्रत तहसीलदार, मंडल अधिकारी ...

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...