जनजागृति सप्ताह निमित्त वनवा संबंधित संवेदनशील गांवांमध्ये वनविभागामार्फत विविध उपक्रम घेतले.कोयना वन्यजीव वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली! News
दिनांक 01/2/22 ते 07/02/2022 या सप्ताह मध्ये सह्याद्रि व्याघ्र राखीव अंतर्गत कोयना वन्यजीव बफर क्षेत्र कुसवड़े परिमंडळ आणि कोयना परिमंडळ मध्ये वनवणवा प्रतिबंध जनजागृति सप्ताह निमित्त वनवा संबंधित संवेदनशील गांवांमध्ये वनविभागामार्फत विविध उपक्रम घेतले. कोयना वन्यजीव वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली वनरक्षक रोहन माने, प्रशांत भोसले, आकाश धवणे, संजय ऐवळे, पार्वती सरगर , सचिन पाटील आणि निसर्ग मार्गदर्शक अनिल बोधे,निलेश फुटाणे, सुशांत शिंदे इ.नी कारवट, घानबी, वाटोळे ,कोयना, रासाटी, मिरगाव, नवजा, पद्मावती माध्यमिक विद्यालय (काटी) ,अवसरी, वन कुसवडे, गावडेवाडी, धुईलवाडी, खुडुपले,वाडीया गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ, सरपंच,शिक्षकवृन्द आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थिति मध्ये वनवा बाबत माहिती देऊन विविध जनजागृतिपर चित्रफित दाखविन्यात आली. तसेच वणवा माहीतीपत्रके वाटण्यात आली.चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी उत्फुर्त सहभाग दाखवून वनवनवा लागणार नाही किंवा अशी घटना घडली तर तात्काळ गावपातळीवर सहकार्य करुन वनवा विझवन्यायासाठी प्रयत्नशील राहन्याचा खंबिर विश्वास व्यक...