पुणे : मुलांचे लसीकरण आजपासून पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Vaccination) लहान मुलांसाठीच्या (Children) टप्प्याला उद्यापासून (ता. ३) सुरुवात होणार आहे. त्यानुसार १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात एक या प्रमाणे चाळीस केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी कोव्हॅक्सिनची (Covaxin) लस दिली जाणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात सकाळी दहा वाजता या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होणार आहे.नाताळच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांचे लसीकरण मोहीम सुरू करण्याविषयी जाहीर केले होते. त्यानुसार महापालिका उद्यापासून प्रारंभ करणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणी शनिवारपासूनच सुरू झाली होती. ५० टक्के ऑनलाइन आणि ५० टक्के ऑफलाइन असे नियोजन केले आहे. त्यामुळे ५० टक्के मुलांना ‘ऑन दि स्पॉट’ येऊन नोंदणी करता येणार आहे. २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या कोविन पोर्टल किंवा ॲप्लिकेशनवर नाव नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय लसीकरणाच्या प्रत्य...