मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर १९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे भर चौकात एका युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली

[ शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे भर चौकात एका युवकाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नागेश सुभाष कराळे ( वय ३८, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. चाकण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (दि.२४) रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ घडली. नागेश कराळे हे आपल्या चारचाकी वाहनात बसत असताना लगतच फोर्ड फिगो वाहनात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी नागेशवर चार गोळ्या झाडल्याचे समजते. या घटनेत नागेश गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांची मयत झाल्याचे घोषित केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल धाव घेऊन पाहणी केली. चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत पंचनामा व फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू . हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. प्रतिनिधी -सागर चव्हाण

कऱ्हाडला पोलिसांनी पकडला दिड लाखांचा गुटखा

  कऱ्हाडला पोलिसांनी पकडला  दिड लाखांचा गुटखा कऱ्हाड : शहर पोलिसांनी (city police)येथील कोल्हापूर (kolhapur) नाका परिसरातील पोपटभाई पेट्रोल पंप(Petrol pump) चौकात रात्री गस्त घालताना उशिरा गुटख्याची तस्कारी रोखली. त्यात पोलिसांनी तब्बल एक लाख ६० हजारांचा गुटखा (Gutkha)जप्त केला. त्यात दोघांना अटक आहे. प्रसाद अनिल देशमाने (वय २४, रा. सावळेश्वर मंदीराजवळ, पुसेसावळी) आणि आकाश दत्तप्रसाद बाचल (२२, रा. गणपती मंदीराजवळ, पुसेसावळी) अशी त्यांची नावे आहेत. कारवाईत दोन लाखांची कारही जप्त आहे.पोलिसांनी सांगितले की, येथील गुन्हे शाखेचे पोलिस रात्रगस्त घालताना पट्रोलिंग करत होते. यावेळी शहरात नाकाबंदी होती.  त्यावेळी येथील पोपटभाई पेट्रोलपंप शेजारी वाहतुक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार राजू पाटील, पोलिस हवालदार पुजा पाटील, बीट मार्शलचे संग्राम पाटील व दिपक पाडळकर बंदोबस्त करत होते. त्यावेळी त्यांनी सिल्वर रंगाची ईस्टम कार (एमएच १४ एएम ९०९२) तेथे अडवली हवालदार पाटील यांना त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी कार तपासली त्यावेळी त्यात गुटखा सापडला. कारमधील दोघा...

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक...अखेर शिवसेनेने पॅनेल केलेच!ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केंद्राची पुनर्विचार याचिकाऑनलाइन शिक्षणामुळे लिखाणाची सवय मोडली, परीक्षेसाठी अर्धा तास जास्त

  👉कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक...अखेर शिवसेनेने पॅनेल केलेच! ▪️जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध ( कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक ) करण्याच्या प्रयत्नाला अखेर मंगळवारी सुरुंग लागला. एक जागा जादा देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने मंगळवारी दुपारी स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करत राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन पॅनेलची घोषणा केली. यामध्ये दोन विद्यमान संचालक खा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर आणि विद्यमान संचालक पी. जी. शिंदे यांच्या पत्नी लतिका शिंदे यांचा समावेश आहे. याशिवाय तालुका विकास सेवा संस्था गटातून भुदरगड व पन्हाळा तालुक्यातील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पॅनेलमध्ये शिवसेनेसह शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही स्थान देण्यात आले आहे. 👉ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केंद्राची पुनर्विचार याचिका ▪️स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निश्‍चित केलेले निकष राज्य सरकारांकडून पूर्ण केले जात नाहीत, तोपर्यंत ओ...

पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २०६ नवे कोरोना रुग्ण! Corona update Pune

  पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २०६ नवे कोरोना रुग्ण पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) शनिवारी (ता.१८) दिवसभरात २०६ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९२ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८६० झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या ही केवळ ९ ने कमी झाली आहे. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हे दोनही मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहेत. शनिवारी दिवसभरात पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये ४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५८, नगरपालिका हद्दीत दोन आणि कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात नऊ कोरोना आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १०० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३४, जिल्हा परिषद क्षेत्रातील ६६, नगरपालिका हद्दीतील आठ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जणांनी कोरोनावर मात केली आहे.सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ८६० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रु...

नागरिकांसाठी नियम आहेत की नियमांसाठी नागरिक? traffic rules

  नागरिकांसाठी नियम आहेत की नियमांसाठी नागरिक?  पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून होत असलेली दंडाची वसुली पाहिली की हा विचार मनात येतो. जेव्हा नागरिकांना एखाद्या नियमाचे महत्त्व पटते, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या नियमांचे पालन आणि ज्यासाठी नियम बनविला आहे ते उद्दिष्ट साध्य होते. हेल्मेट वापराबाबत हे होत नाही. नियमपालनाची सक्ती आणि नागरिकांना द्यावयाच्या पायाभूत सुविधा यातील दरी वाढत असल्याने हे नियम जाचक वाटत आहेत.  पुण्यात आज नेमके हेच होत आहे. देशभरात रस्ते अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने हे होत असल्याचा निष्कर्ष केंद्र सरकारने काढला आहे. याला मज्जाव करण्यासाठी वाहतूक नियमांच्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. महामार्ग, राज्यमार्ग, रिंगरोड अशा ठिकाणी हे योग्यच आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले गेलेच पाहिजेत. त्यात कोणतीही शंका असण्याचे मुळीच कारण नाही. बेशिस्त वाहन चालकांमुळे अनेक निष्पाप लोकांचे प्राण जातात, त्यामुळे नियमांमधील ही सुधारणा स्वागतार्ह आहे. मात्र, केवळ ‘वसुली’ हा उद्देश ठेवून नियमावर बोट ठेवले, तर मात्र त्या ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात! Pune Breaking News

  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. सध्या भाजपचे नेते राज्यातील सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत असताना केंद्रीय सहकार मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अमित शहा पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. पुणे महानगरपालिका निववडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यालाही ते उपस्थिती लावणार आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात अमित शहा यांनी गणपतीची पूजा केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मंदिरात अमित शहा यांनी गणपतीची पूजा आणि प्रार्थना केली. संपादक- श्री नितीन चव्हाण