नाथपंथी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे असे निवेदन अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीश पवार व नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना केले नाथपंथी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे ठाणे : स्वातंत्र्यासाठी ७५ वर्षे झाली तरीही नाथपंथी समाजाचा विकास झालेला नाही . या समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची गरज आहे मागणी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना दिलेल्या निवेदनात अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीश पवार यांनी केली आहे . नाथपंथी समाजाच्या शिष्टमंडळाने पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांची गुरुवारी भेट घेतली . त्यावेळी जिल्ह्यातील या समाजाची संख्या अत्यल्प असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून देत महामंडळाची मागणी लाऊन धरली . या समाजातील लोकांचा मानव विकास निर्देशांक खुप कमी आहे . लोक अद्यापही उच्चशिक्षित नाही . त्यामुळे शासनाच्या योजनांची माहिती नाही. सध्या वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ आहे परंतु या मध्ये एकूण २८ ते २ ९ जातींचा समाव...