मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट १७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती

छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती – 1285 हेक्टर जमीन निश्चित जागरुक लोकमत समाचार पुरंदर (जि. पुणे) | दि. 23 ऑगस्ट 2025 छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला गती – 1285 हेक्टर जमीन निश्चित पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती; भूमिसंपादन प्रक्रियेला वेग पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा प्रतिकात्मक फोटो दीर्घ प्रतिक्षेनंतर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात ठोस पावले उचलली जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली एकूण 1285 हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली आहे. गावनिहाय भूमिसंपादन क्षेत्र गाव क्षेत्र (हे.आर.) एकतपूर (१) 201 खानवडी 266 कुंभारवळण 255 मुंजवडी (३) 71 पारगाव 188 उदाचिवाडी 49 वनपुरी 175 महत्वाची माहिती संमतीपत्र नोंदणी कालावधी: 25 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर नोंदणी ठिकाण 1: उपविभ...

भारतामध्ये ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप्स बंदी – संसदेत विधेयक मंजूर

Jagruk Lokmat Samachar जागरुक लोकमत समाचार नवी दिल्ली – देशात वाढत्या ऑनलाइन बेटिंग आणि मनी गेम्सच्या धोक्याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. संसदेत दोन्ही सभागृहांतून “ऑनलाइन गेमिंग (प्रोत्साहन व नियमन) विधेयक, २०२५” मंजूर झाले असून यामुळे देशभरातील सर्व बेटिंग अ‍ॅप्स व पैसे लावून खेळले जाणारे ऑनलाइन गेम्स आता बेकायदेशीर ठरणार आहेत. विधेयकाची मुख्य वैशिष्ट्ये सर्व प्रकारचे रिअल मनी गेमिंग अ‍ॅप्स – फॅण्टसी स्पोर्ट्स, ऑनलाइन रम्मी, पोकर, लॉटरी व बेटिंग प्लॅटफॉर्म्सवर संपूर्ण बंदी. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंत कारावास व एक कोटी रुपयांपर्यंत दंड, पुनरावृत्ती झाल्यास ५ वर्षांपर्यंत कारावास व दोन कोटी रुपयांपर्यंत दंड. बँका व पेमेंट सिस्टीम्सना अशा व्यवहारांना परवानगी नसेल. तरुणांना सुरक्षित ठेवण्यासाठी ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक व सामाजिक गेमिंगला प्रोत्साहन. राष्ट्रीय ऑनलाइन गेमिंग आयोग स्थापन होणार जो परवाने, नियम व तक्रार निवारण सांभाळेल. सरकारची भूमिका सरकारचे म्हणणे आहे की, ऑनलाइन जुगारामु...

पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची २०२५-२०३० संचालक मंडळ निवड संपन्न

जागरूक लोकमत समाचार दिनांक: २ ऑगस्ट २०२५ | स्थान: सासवड | वार्ताहर – प्रतिनिधी पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२५-२०३० कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मा. आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या आई आनंदीकाकी चंदुकाका जगताप अध्यक्षपदी तर कृष्णा शेट्टी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. नवनिर्वाचित अध्यक्ष आनंदीकाकी जगताप व उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांचा गौरव सोहळा निवड प्रक्रियेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे , जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई , सरव्यवस्थापक संजय शितोळे , जिल्हा विशेष लेखा परीक्षक संजय पाटील , कार्यालयीन अधीक्षक संजय ससाणे , सहकारी अधिकारी सोनाली देसाई तसेच सिद्धार्थ झांजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंकुशराव जगताप, आनंदराव घोरपडे, डॉ. विनायक खाडे, राजेश इंदलकर, गुरुनाथ कोथेर, अनिल कामट...

NDA कडून उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची अधिकृत उमेदवारी

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना NDA तर्फे भारताच्या उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी जागरूक लोकमत समाचार प्रकाशित: 18 ऑगस्ट 2025 ब्रेकिंग महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाची NDA तर्फे उमेदवारी सामाजिक व शैक्षणिक कार्यातील अनुभव आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन देशाच्या विकासात मोलाचा ठरेल, असा विश्वास. नवी दिल्ली : महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्यातील त्यांचा अनुभव आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन देशाच्या विकासात नक्कीच मोलाचा ठरेल. स्थान: नवी दिल्ली तारीख: 18 ऑगस्ट 2025 मुख्य मुद्दे सी. पी. राधाकृष्णन — महाराष्ट्राचे राज्यपाल व अनुभवी भाजपा नेते. NDA कडून उपराष्ट्रपती पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर. उपराष्ट्र...

शिरवळ ग्रामसभेत लोकजनशक्ती पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा प्रियांकाताई भोसले यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न; भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार – प्रियांकाताईंचा ठाम इशारा

शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत वादळी वातावरण निर्माण झाले. प्रश्नांचा अक्षरशः भडीमार होत असताना लोकजनशक्ती पार्टी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा सौ. प्रियांकाताई भोसले यांनी थेट भ्रष्टाचारावर निशाणा साधला. मुख्य मुद्दे: शिरवळ ग्रामसभेत लोकजनशक्ती पार्टी महिला जिल्हा अध्यक्षा प्रियांकाताई भोसले यांना काही कथित पुढाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांच्या उपस्थितीतच प्रियांकाताई संतापाने उफाळून आल्या आणि ठामपणे जनतेसमोरच उत्तर देत कथित पुढाऱ्यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला. त्यांनी संतप्त शब्दांत म्हटले – “स्वातंत्र्याला ७८ वर्षे झाली तरी आज महिलांचा आवाज दाबला जातो, हा मोठा अन्याय आहे. मात्र लोकजनशक्ती पार्टी व महिला आघाडी अशा प्रवृत्तीला कडाडून विरोध करणार आहे.” “१५-१६ वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न होतोय. पण हे पांढऱ्या कपड्यातील कथित चोर आम्ही जनतेसमोर उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही.”  “गावात विकासाचा प्रकाश दिसत नाही म्हणून आम्ही प्रश्न विचारतो. मग गावाचा प्रश्न विचार...