शर्यतीला परवानी दिल्याने कऱ्हाडात शेतकऱ्यांचा जल्लोष कऱ्हाड - बैलगाडी शर्यतीवरील (Bullockcart Race) बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं (State Government) दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी (Ban) उठवली आहे. त्यामुळे राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी (Permission) देण्यात आली आहे. या निर्णयाचे येथील बैलगाडी मालक-चालकांसह शौकींनी गुलालाच्या उधळणीत पेढे वाटुन फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे . प्रतिनिधी-मोहिनी लोंढे