👉कोल्हापूर जिल्हा बँकेचे इच्छुक फोडणार घाम ▪️कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता २० संचालकांसाठी २२४ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी गगनबावडा तालुक्यातून दोघांनी माघार घेतली. यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी एकही उमेदवार माघारीसाठी निवडणूक कार्यालयाकडे फिरकला नाही. उमेदवारी संदर्भात आघाडीच्या नेत्यांची बैठकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच माघारीची प्रक्रिया गती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारीवर अडून बसणारे इच्छुक माघारनाट्यात घाम फोडण्याची शक्यता आहे.जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत एकूण प्राप्त ३६८ अर्जांपैकी १२३ दुबार अर्ज रद्द करण्यात आले, तर १९ जण अपात्र ठरले होते. मंगळवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली.बँकेच्या निवडणुकीत २२६ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (दि. ०७) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या दोघांनी माघार घेतली. 👉 कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे सौंदर्य खुलणार.. ▪️प्राचीन स्थापत्याचा आविष्कार असणार्या करवीर नि...