बालगंधर्व रंगमंदिर चौकातील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित पुणे : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्व. राजारामबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते जयंतराव पाटील यांचा केलेला अपमान संतापजनक असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केला. या निषेधार्थ पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व रंगमंदिर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तर त्यांना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही घोषणाबाजी करून धिक्कार करण्यात आला. या आंदोलनात ॲड. निलेश निकम, किशोर कांबळे, डॉ. सुनील जगताप, डॉ. शशिकांत कदम, रोहन पायगुडे, स्वप्निल जोशी, केतन ओरसे, मनाली भिलारे, विद्या ताकवले, विक्रम जाधव, अजिंक्य पालकर, तानिया साळुंखे, रमिझ सय्यद, प्राजक्ता जाधव, दिलशाद अत्तार, शैलेंद्र बेल्हेकर, आसिफ शेख आदींसह शहरातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.