मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट ३१, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेजुरीत नाथपंथी डवरी गोसावी समाजाला जात प्रमाणपत्र – विजय जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

जागरूक लोकमत समाचार जेजुरी (पुरंदर तालुका): शिवमल्हार मार्तंड खंडेरायाच्या नगरी जेजुरी येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाला अखेर जात प्रमाणपत्र मिळाले असून हा नगरपरिषद कार्यक्षेत्रातला राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे. गेल्या कित्येक दशकांपासून हा समाज जेजुरीत वास्तव्य करत असून मार्तंड मल्हारीची सेवा, जागरण-गोंधळाची पारंपरिक कला सादर करत शिवकालीन संस्कृती जपत आहे. मात्र, जात प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून समाज वंचित होता. जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी या समाजाच्या प्रश्नाची दखल घेतली. पुणे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुड्डी, पुरंदर उपविभागीय अधिकारी मा. वर्षा लांडगे, तहसीलदार राजपूत साहेब, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. इंगवले, निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, महसूल नायब तहसीलदार मा. वाघ, मंडल अधिकारी मा. बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेद्वारे जेजुरीतील नाथपंथी डवरी गोसावी समाज बांधवांना जात प्रमाणपत्र मिळाले. या ऐतिहासिक यशामुळे समाजातील बांधवांनी...

सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हा सरचिटणीस पदापर्यंतचा प्रवास

  गणेश दुर्योधन भोसले यांचे सेवाभाव आणि निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण भाजप संघटनेतील एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून आज गणेश दुर्योधन भोसले हे भाजप पुणे ग्रामीण दक्षिण विभागाचे जिल्हा सरचिटणीस या महत्त्वाच्या पदावर पोहोचले आहेत. संघटनेत लहानमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी नेहमीच “कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता” अशी ओळख जपली. महिलांसाठी उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे या कामातून त्यांनी समाजाशी थेट नाळ जोडून ठेवली आहे. लोकांच्या अडचणी ऐकून त्यावर तोडगा काढणे हेच त्यांचे खरे बळ ठरले. याच सातत्यपूर्ण सेवाभाव आणि अथक प्रयत्नांची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साहाचे वातावरण असून, गणेश दुर्योधन भोसले यांचा प्रवास समर्पण, निष्ठा आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. Full Width Line                 संपादक - नितीन चव्हाण