मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर ७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सासवडमध्ये वीर येलोजी गोठे समाधीस्थळ वाचवण्यासाठी बेमुदत उपोषण – पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली लढा

सासवडमध्ये वीर येलोजी गोठे समाधीस्थळ वाचवण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण सासवड (ता. पुरंदर, जि. पुणे) : मातंग समाजाचे व स्वराज्याचे शिलेदार वीर येलोजी गोठे यांच्या समाधीस्थळावरील अतिक्रमणाविरोधात तसेच संवर्धनाच्या मागणीसाठी नगरपरिषदेसमोर ११ सप्टेंबरपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू झाले आहे. हे उपोषण पुरोगामी संघर्ष परिषदेच्या नेतृत्वाखाली सुरू असून युवक राज्याध्यक्ष मनोज दादा भिसे मार्गदर्शन करीत आहेत. उपोषणाद्वारे समाधीचे काम पूर्ण करणे, परिसरातील अतिक्रमण हटवणे आणि वीर येलोजी गोठे यांचा पुतळा उभारणे या प्रमुख मागण्या व्यक्त केल्या आहेत. समाधीस्थळाची विटंबना होत असल्याने हा प्रकार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याची मागणीही उपोषणाद्वारे केली जात आहे. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे. युवक अध्यक्ष स्वप्निल पाटोळे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे  उपाध्यक्ष सचिन कांबळे यांनी समर्थन पत्र सादर केले. ✦  मुख्य मागण्या समाधीस्थळावरील...

भटक्या विमुक्त समाजाला अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे रि. पोलीस उपाधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांचा संघाचा जाहीर पाठिंबा

मुंबई – नाथपंथी डवरी गोसावी समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या ठाम मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता आणखी बळ मिळाले आहे. अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज संघाचे रिटायर्ड पोलीस उपाधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. समाजाची मागणी स्वातंत्र्यानंतरही भटका विमुक्त  नाथपंथी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला आहे. शिक्षण, नोकरी आणि मूलभूत सुविधा यांचा समाजातील मोठ्या घटकाला अद्याप लाभ मिळालेला नाही. आज काही तरुण शिक्षण घेऊन पुढे येत असले तरी शासनाकडून आरक्षणाच्या स्वरूपात योग्य पाठबळ मिळाल्यास ही प्रगती गतीमान होईल, असा ठाम विश्वास समाजाने व्यक्त केला आहे. या मागणीसाठी आझाद मैदान, मुंबई येथे भटक्या विमुक्त समाज उपोषण करत आहे. या उपोषणाचे नेतृत्व पद्मश्री लक्ष्मण माने करत असून शासनाने तातडीने समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली आहे. याच आंदोलनाला पाठिंबा देताना मच्छिंद्र चव्हाण यांनीही स्पष्ट केले की, “समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची अंमलबजावणी काळाची गरज आहे. शासनान...

भटक्या विमुक्तांच्या प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी पुण्यात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

पुणे प्रतिनिधी – भटक्या विमुक्त जाती-जमातींच्या प्रलंबित योजनांबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी मा. जितेंद्र डुडी साहेब यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे आयोजन आणि पुढाकार जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी घेतला. समाजाच्या न्यायहक्कासाठी सातत्याने लढा देणाऱ्या विजय जाधव यांच्या अथक प्रयत्नांमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर जात प्रमाणपत्रे मिळाल्याने समाजात अपार आनंदाचे वातावरण आहे. विजय जाधव यांनी सांगितले की, या निर्णयामुळे भटक्या-विमुक्त बांधवांना शासनाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचवेळी जिल्हाधिकारी साहेबांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबविण्यासंदर्भात तातडीने आदेश दिले असून, शासनाच्या सर्व योजना तळागाळातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतील, यासाठी महसूल विभाग पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. या बैठकीत खालील महत्त्वाच्या योजना आणि कागदपत्रांच्या अटी सोप्या करण्याबाबत चर्चा झाली : फिरते रेशनिंग कार्ड विधवा परितक्ता अंध-अपंगत्व यो...