सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील व भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव सातारा जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या संदर्भामध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न
सातारा : सातारा जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांच्या उपस्थितीत भटक्या व विमुक्त जाती-जमातींच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर भैरव क्रांती सेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भैरव क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय जाधव यांनी लोणंद, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि म्हसवड तालुक्यातील भटक्या-विमुक्त समाजासमोरील अडचणी सविस्तरपणे मांडल्या. विशेषतः घरकुल, जमीन हक्क तसेच महत्त्वपूर्ण शासकीय दस्तऐवज मिळविण्यात येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच, “यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना” जलद आणि सुलभ पद्धतीने राबविण्याची मागणी अध्यक्ष जाधव यांनी केली. या मागणीवर जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांनी तत्काळ प्रतिसाद देत, महसूल विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. या बैठकीस प्रदेश संघटक मोहन शिंदे, प्रदेश सदस्य विक्रम पवार, सातारा महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रिया पवार, सुनील चौगुले, फलटण तालुका अध्यक्ष विकास शिंदे, खंडाळा तालुका अध्यक्ष अविनाश पवार, लोणंद शहराध्यक्ष करण चव्हाण, कोरेगाव तालुका अध्यक्ष रवी जाधव...