पालावरली संविधान शाळा दिनांक ५ फेब्रुवारी रोजी काझी टाकळी येथे भटक्या-विमुक्तांची पाल उतरली होती. त्या ठिकाणी संविधान प्रचारक अजिनाथ शिंदे व अतिश पारवे यांनी जाऊन त्यांना संविधान समजावून सांगितले. संविधानिक मूल्य सांगितले. तसेच न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, व त्यांचे हक्क, अधिकार सांगितले. तसेच अंधश्रद्धा, शिक्षण, बाल विवाह, याच्यावर बराच वेळ चर्चा झाली. आणि आम्ही त्यांना सांगितले की मुलांना शिक्षण द्या. मोठे अधिकारी बनवा. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणा. याशिवाय तुमची प्रगती होणार नाही. असं कुटवर फिरणार त्यामुळे एका जागेवर स्थायिक व्हा तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल घरकुल, आधार कार्ड, रेशन कार्ड मिळेल व घरा खालची जमीन मिळेल. व रोजगार उपलब्ध होईल. अशा अनेक चर्चा झाल्या. व त्यांनी आम्हाला सांगितले की आमचे मुलं शाळेत पाठवणार. तसेच बाल विवाह करणार नाही. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते पाहून आम्हाला खूप बरं वाटलं... सहसंपादक - मोहन भीमराव शिंदे