भटक्या विमुक्त समाजाला अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघाचे रि. पोलीस उपाधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांचा संघाचा जाहीर पाठिंबा
![]() |
मुंबई – नाथपंथी डवरी गोसावी समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या ठाम मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता आणखी बळ मिळाले आहे.
अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज संघाचे रिटायर्ड पोलीस उपाधीक्षक मच्छिंद्र चव्हाण यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे.
समाजाची मागणी
स्वातंत्र्यानंतरही भटका विमुक्त नाथपंथी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिला आहे. शिक्षण, नोकरी आणि मूलभूत सुविधा यांचा समाजातील मोठ्या घटकाला अद्याप लाभ मिळालेला नाही. आज काही तरुण शिक्षण घेऊन पुढे येत असले तरी शासनाकडून आरक्षणाच्या स्वरूपात योग्य पाठबळ मिळाल्यास ही प्रगती गतीमान होईल, असा ठाम विश्वास समाजाने व्यक्त केला आहे.
या मागणीसाठी आझाद मैदान, मुंबई येथे भटक्या विमुक्त समाज उपोषण करत आहे.
या उपोषणाचे नेतृत्व पद्मश्री लक्ष्मण माने करत असून शासनाने तातडीने समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांत केली आहे.
याच आंदोलनाला पाठिंबा देताना मच्छिंद्र चव्हाण यांनीही स्पष्ट केले की, “समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची अंमलबजावणी काळाची गरज आहे. शासनाने विलंब न लावता समाजाच्या मागणीवर निर्णय घ्यावा.
भटक्या विमुक्त आणि नाथपंथी समाजाला शासनाकडून न्याय मिळावा, आरक्षणाचा लाभ मिळावा आणि समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.