"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"
अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी
मुंबई | ४ ऑगस्ट २०२५
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे.
पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे.
📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी,
आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला.
संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा
या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले.
नेतृत्वाचे मोलाचे योगदान
या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ, (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण, सौ. रेखाताई मछिंद्र चव्हाण, तसेच अनेक समाजबांधवांनी सातत्याने शासन दरबारी ठोस भूमिका घेतली.
समाजासाठी आत्मसन्मानाचा क्षण
हा निर्णय नाथपंथी समाजाच्या संघर्षाला, अस्मितेला आणि एकतेला मिळालेला शासनदरबारी मान आहे. यामुळे समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दिशा अधिक प्रभावीपणे खुल्या होतील.