देशात लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे आणि आतापर्यंत 74 कोटी 38 लाख 37 हजार 643 डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 53 लाख 38 हजार 945 लोकांना लसीकरण.
![]() |
दिलासादायक! देशात नवीन रुग्णांची संख्या कमी झाली, कोरोनामुक्त वाढले |
नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांची संख्या आता कमी होताना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यात केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली होती. केरळमध्ये ओणमनंतर रुग्ण वाढले होते. त्यामुळे आता महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
दरम्यान, देशात रविवारी दिवसभरात २७ हजार २५४ नवे रुग्ण आढळले असून २१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३२ लाख ६४ हजार १७५ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या ३ लाख ७४ हजार २६९ सक्रीय रुग्ण आहेत. तर ३ कोटी २४ लाख ४७ हजार ३२ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. भारतात कोरोनामुळे ४ लाख ४२ हजार ८७४ जणांचा मृत्यू झाला आहे.