महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीअजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते वडूज येथे नवीन पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन.
वडूज येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन श्रीअजितदादा पवार साहेब यांनी केले. पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा असताना त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची आहे.10 कोटी रु. चा अतिरिक्त निधी. सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 10 कोटी दिले जातील. येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले.
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar inaugurates new police station building at Vaduj.
पोलिसांवर येणारा ताण लक्षात घेता पोलीस भरतीला परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांचे प्रश्न सोडवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पोलिसांनी 'Smart Police'च्या माध्यमातून जनतेच्या मनात विश्वासाचं वातावरण निर्माण करावं. गुन्ह्यांचा वेगानं तपास, त्यातील अचूकता, नव्या तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधांचा क्षमतेनं वापर, पोलीस पाटलांशी संवाद वाढवणं ह्या माध्यमांतून आपली चांगली प्रतिमा निर्माण करावी. पोलीस स्टेशनचे मानांकन निश्चित करावे
सहसंपादक-श्री मोहन शिंदे