ठाणे प्रतिनिधी (मुंब्रा):प्रेयसी पासुन विभक्त करण्यासाठी कट रचुन पिस्टल चा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना मुंब्रा पोलिसांनी केले 48 तासात जेरबंद.
बेडेकर नगर , दिवा पुर्व येथील एक इसमावर दिनांक 15/09/ 2021 रोजी रात्रौ १०.३० वा.चे.सुमारास ते राहत्या घरातुन कामावर जाण्यासाठी अॅटोरिक्षातुन जात असताना आगासन रोड वरील मानव कल्याण हॉस्पीटल समोर दोन अज्ञात व्यक्तीनी विना नंबरच्या मो.सा.वरून येवुन अॅटोरिक्षा अडवुन सदर इसमावर पिस्टल रोखुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यावेळी प्रसंगावधान राखुन फिर्यादी शेजारी असलेल्या मानव कल्याण हॉस्पीटल येथे आश्रय घेतला . त्यानंतर आरोपीस फिर्यादी मिळुन न आल्याने ते पळुन गेले . अशा तक्रारीवरून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुरजि क्र . | 893|2021 भा.द.वि.कलम 506( 2 ) , 504, 341, 120 ( ब ) सह आर्म अॅक्ट 3,25अन्वये दिनांक 16/09/2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता .
घटनास्थळावर मिळालेल्या सी.सी.टी.व्ही . फुटेजच्या आधारे गोपनीय माहीती व तात्रीक तपास करून प्रत्यक्षा पिस्टलचा धाक दाखवुन गुन्हा करणारे दोन्ही आरोपी १ ) साजन जयदास पाटील वय २१ वर्षे रा . स्वत : चे घर , गाव नारायणगाव , ता.अंबरनाथ जि.ठाणे २ ) सनी सुरेश राजभर वय २१ वर्षे रा . रूम नं . ६०३.सहावा माळा , अर्जुन हाईटस , साई हॉस्पीटलचे समोर , वैभव नगरी , डोंबिवली पु.जि.ठाणे तसेच कटाचे मुख्य सुत्रधार ३ ) रूपेश अभिमन्यु पाटील वय ३१ वर्षे , धंदा- हॉटेल , रा.ठि. रूम नं २०२ , शिवधाम अपार्टमेंट , पडले गांव , जि . ठाणे ४ ) अंकीत मोरेश्वर शिंदे वय २५ वर्षे , धंदा- सलुन , रा.ठि. वामन बाबा वाडी , तळोजा मजकुर , वामन बाबा मठ , ता पनवेल , जि . ठाणे यांना मुंब्रा पोलीस ठाण्याचे तपास पथकाने ४८ तासाच्या आत ताब्यात घेवुन दिनांक 18/09/2021. रोजी अटक केलेली आहे .
सदर आरोपी कडे केलेल्या तपासात अटक आरोपी पैकी रूपेश अभिमन्यु पाटील याचे फिर्यादी याच्या पत्नी सोबत प्रेम संबंध असुन , सदर प्रेयसी पासुन तिच्या पती तथा फिर्यादी यांना अलग करून तिला सोडून अन्यत्र निघून जाण्यासाठी त्यांनी वरील अटक आरोपीत सोबत कट रचुन सदरचा गुन्हा केलेला असले बाबत निष्पण झालेले आहे .
याशिवाय अटक आरोपी रूपेश अभिमन्यु पाटील याने सनी सुरेश राजभर तसेच इतर अन्य आरोपी वर बरोबर कट रचून यापुर्वी दिनांक २७/१२/२०२१ रोजी दिवा इंपीग जवळ , खर्डी रोड वर दाखल गुन्हयात फिर्यादींची मोटार सायकल आडवून प्राणघातक हल्ला करून फिर्यादी यांच्याकडील रोख रक्कम चोरी केलेली असल्याचे देखील निष्पन्न होत आहे सदरबाबत मुंब्रा पोलीस ठाणे गु.र.क१०१ ९ / २०२० भादवि कलम३९ ४,३४१,३४ नोंद असून सदरचा तपास चालू आले .
तपासादरम्यान अटक आरोपी सनी सुरेश राजभर याच्या कडुन गुन्हयात वापरलेली पिस्टल व दोन जिवंत काडतुस व मोटार सायकल असा मुददेमाल जप्त करण्यात आले . याशिवाय सर्व आरोपीचे गुन्हयासाठी वापरण्यात आलेले मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे .
सदरची कामगिरी हि मा . श्री जगजीत सिंग , पोलीस आयुक्त , ठाणे शहर , श्री सुरेश कुमार मेकला , सह पोलीस आयुक्त ठाणे शहर , मा . श्री . अनिल कुंभारे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग , ठाणे शहर , मा . श्री अविनाश अंबुरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ , ठाणेशहर , मा . श्री व्यंकट आंधळे , सहायक पोलीस आयुक्त , कळवा विभाग , ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा . श्री मधुकर कड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , मुंब्रा पोलीस ठाणे , सहायक पोलीस निरीक्षक श्री एस.एस.शेळके , सहायक पोलीस निरीक्षक श्री संतोष उगलमुगले , पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे , पो.हवा / ६८४ मोरे , पोह ६२४० / रहिश जाधव , पोना / ६१९ ६ मोरे , पोना / ७०५८ पाटील , पोना / ३१४४ घोडके , पोना / तामोरे , पोना / २८० ९ सोळंके , पोना / ७२९९ वैरागकर , पोना ७११७ / विजय सपकाळे , पोशि / ४२८० शिंदे पोकॉ / माळी या पथकाने केली आहे . सदर दोन्ही गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके व पोलीस उप निरीक्षक दिपक घुगे करीत आहे .
मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके यांनी व त्यांच्या टीमने असे असंख्य गुन्हे उघडकीस आणले आहेत त्याचबरोबर माणुसकीचे दर्शन घडवले आहे.त्यांच्या या कार्यासाठी भटका विमुक्त समाज संघर्ष समिती अध्यक्ष श्री विकास जगताप व सर्व समितीचे सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके व यांच्या संपूर्ण टीमला राष्ट्रपती पुरस्कार मिळावे याच्यासाठी शिफारस करणार आहे.
सहसंपादक-श्री मोहन शिंदे