दीपावली विशेष लेख मृत्यू ला लाजवणारी कामगिरी असली पाहिजे
सार्वजनिक जीवनात काम करत असताना निरपेक्ष अन निस्वार्थी पणे काम करत असताना तसेच कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करत असताना अनेक अडचण येतात असतात कधी अभिनंदन चा वर्षाव होतो तर कधी प्रखर टीका त्यात प्रचंड भीती असते ती बदनामी ची गेली अनेक वर्षापासून राज्यातील पत्रकारांच्या उन्नती साठी प्रगती साठी तसेच शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता केवळ पत्रकारांच्या हितासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी कौटुंबिक जीवन पणाला लावून व भौतिक सुखाचा त्याग करून पत्रकारांच्या प्रश्नावर कुटुंब बाजूला सारून वारंवार आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करतोय इतकंचं काय अनेक वेळा थेट पोलीस ठाण्यात देखील जाऊन पत्रकारांच्या अडचणी सोडवल्या आहेत अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात जाऊन वरिष्ठाकडे, मुख्यमंत्री, राज्यपाल, गृहमंत्री मुख्यसचिव व थेट मंत्रालयात तक्रारी केल्याने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच चौकशी लागल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत त्याच बरोबर पत्रकारांच्या अडचणीत अनेक अधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका बजावली आहे त्यामुळे पत्रकारांचे नेतृत्व करत असतात मला आनंद तर मिळालाचं शिवाय समाधान देखील वाटते
सुख म्हणजे नक्की काय असतं?
याची व्याख्या जरी वेगळी असली तरी मला तर पत्रकारांचे प्रश्न सोडवल्याने यातच माझं खरं सुख आहे असं वाटतं जोपर्यंत आपण इतरांसाठी झगडत नाही संघर्ष करत नाही अडचणीत जात नाही त्याला नेतृत्व करता येत नाही समाज त्याला स्वीकारत नाही किंवा त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही
मरणाने देखील मान खाली घातली पाहिजे
जो जन्माला आला तो मरणारचं या मधील आंतरात चांगले काम करून नवा आदर्श निर्माण करायला हवा नावंलौकिक तर होईलचं शिवाय जीवन इतरांसाठी जीवन जगल्याचा आनंद देखील मिळेल
मृत्यू ने देखील शरमेने मान झुकवली पाहिजे
शेवटी आपण किती जगलो या ऐवजी कसा जगलो याला खरा अर्थ आहे आपलं जीवन दुसऱ्यासाठी समर्पित असलं पाहिजे स्वतः साठी आपण जगतोय इतरांसाठी कधी जगणार? मरताना देखील आपल्या इतरांसाठी मी जगलोय आता कोणतीही इच्छा राहिली नाही म्हूणन आंनदाने प्राण सोडले पाहिजे तरच आयुष्यात आपण काहीतरी कमावलं त्याचा हेवा व गर्व वाटला पाहिजे मृत्यूने ला देखील मान खाली घालून आपलं स्वागत केलं पाहिजे तरंच आपलं जीवन आणी मरण सार्थकी झाले असं समजावं
पत्रकार समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष -यशवंत पवार ✍🏻