मुख्य सामग्रीवर वगळा

सरकारची दिवाळी तर पत्रकारांचे दिवाळे

 सोलापूर प्रतिनिधी: जवळपास दोन वर्षापासून जीवघेणा कोरोना महामारी ने केवळ राज्यात नव्हे जगात धुमाकूळ घातला असून राज्यात कोरोना चे अस्मानी संकट ओढावले केंद्र सरकार अन राज्य सरकार मध्ये समनवय नसल्याने कोरोना चे पडसाद मोठया प्रमाणात उमटले या महामारी ला अटकाव करण्यासाठी संचार बंदी लॉक डाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करण्यात आला सर्व व्यवहार व दळणवळण बंद करण्यात आले याचे गंभीर परिणाम केवळ जनतेवर झाले नसून पत्रकारांना देखील याची झळ पोहोचली असून अनेक वृत्तपत्रे बंद पडल्याने पत्रकारांवर उपासमारी ची वेळ आली.

Patrkar samiti Maharashtra

अश्या वाईट प्रसंगी वृत्तपत्र च्या मालकांनी पत्रकारांना घरचा रस्ता दाखवला कामावरून कमी करून अश्या वाईट व बिकट परिस्थितीत राज्य सरकार ने पत्रकारांना वाऱ्यावर सोडत कोणतीही मदत केलेली नाही पत्रकारांचे नोंदणी कधी ? देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंचाहत्तर वर्षे झाली परंतु राज्यात पत्रकारांची नोंदणी नसल्याने राज्यात पत्रकार किती ? याची आकडेवारी सरकार कडे नाही शिवाय पत्रकारांची नोंदणी नसल्याने केंद्र सरकार किंवा राज्य सरकार च्या विविध योजनेचालाभ केवळ नोंदणी नसल्याने पत्रकारांना मिळत नाही ही बाब खूपच गंभीर असून पत्रकारांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे.

 पत्रकारांच्या मृत्यू चं काय ? कोरोना मुळे राज्यात सुमारे चारशे पत्रकारांचा बळी गेला असून इमानइतबारी करणारी पत्रकारिता अखेर चा घटका मोजत असताना देखील राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने अनेक पत्रकारांचा करुण अंत झाला याला जबाबदार कोण ? स्वतः चे कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून राज्य सरकार च्या बातम्या लावणाऱ्या पत्रकारांचा मृत्यू मनाला चटक लावून तर गेलाच त्याच बरोबर राज्य सरकार ची अब्रू देखील वेशीवर टांगून गेला.

 संघटना मधील भेदभाव पत्रकारांना मारक राज्यात पत्रकार

 संघटना उदंड झाल्या असून ज्यांना पत्रकारांचे मूलभूत प्रश्न माहित नाहीत असं लोकं पत्रकार संघटना निर्माण करून पत्रकारांमध्ये भांडणे लावण्याचे काम करत असल्याने नेमकं कोणत्या संघटना मध्ये काम करायचे ? असा प्रश्न राज्यातील पत्रकारांना पडला असून पत्रकारांचे नेते म्हूणन मिरवणारे त्यांना पत्रकारांचे प्रश्न दिसत नाहीत केवळ मंत्रालयात बसून संघटना चालवून आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानत असल्याने पत्रकारांचे हाल कुत्रं खाईना अशी वाईट वेळ येऊन ठेपली असताना राज्य सरकार केवळ बोटचेपी धोरण स्वीकारून तमाशा पाहण्याचं काम राज्यातील अनेक करत असून पत्रकारांचे प्रश्न धूळ खात पडले जबाबदार आता पर्याय नाही कोण ? आहेत याला एकजुटीला जोपर्यंत राज्यातील पत्रकार एकत्र येऊन राज्य सरकार विरोधात लेखणी बंद आंदोलन करत नाहीत किंवा राज्य सरकार च्या बातम्या वर सामुदायिक बहिष्कार टाकत नाहीत तोपर्यंत पत्रकारांचे प्रश्न सूटणार नाहीत हे कायम ध्यानात ठेवा.

                यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समिती                                    प्रदेशाध्यक्ष ,महाराष्ट्                          

     

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...