भटका विमुक्त संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. ज्ञानेश्वर गणोरे व सहाय्यक पोलीस श्री.हनुमंत वाघमोडे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित.
सांताक्रुज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर गणोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.हनुमंत वाघमोडे यांना भटका विमुक्त समाज संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने श्री विकास जगताप यांच्या हस्ते आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Through Bhatka Vimukta Sangharsh Samiti and Patrakar Suraksha Samiti, Senior Inspector of Police Shri. Dnyaneshwar Ganore and Assistant Police Inspector Mr. Hanumant Waghmode honored with Maharashtra Bhushan Award.
देशावर, राज्यावर कुठलेही संकट येऊ द्या, या संकटाशी सामना करताना सर्वात पुढे पोलीसच असतो, मग ते संकट अतिवृष्टीचे असो अथवा महामारीचे असो पोलीस कधीही मागे सरकत नाही. या संकटांशी सामना करण्यासाठी सर्वात पुढे तो पोलीस, प्रत्येकाला संकटाच्या वेळी आठवतो तो पोलीस, मदतीसाठी सर्वात अगोदर धावून येतो तोदेखील पोलीसच असतो.
जगभरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना-कोव्हिड-19 महामारीच्याया संकट काळामध्य मुंबई शहरांमध्ये या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत संचारबंदी, लॉकडाऊन बाबत कडक भूमिका घेऊन कोरोणा महामारीच्या प्रसाराला प्रतिबंध घातला. व पुन्हा एकदा आपल्या खाकीतील देव माणसाचे दर्शन समाजास घडविले, व आपल्या कार्याची वेगळीच छाप निर्माण केली, अनेक गुन्ह्यांचे तपास काही क्षणातच लावले कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये रात्रंदिवस लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे अंमलबजावणीसाठी जागता पहारा देऊन प्रसंगी संचारबंदीचे नियम मोडनाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगरलाला जात होता.
ज्या ठिकाणी कोरोणांचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या ठिकाणी रेडझोनची कडक अंमलबजावणी करून सर्वसामान्य जनतेला त्याचा नाहक त्रास होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली, यावेळी कोरोना बाबत चुकीची माहिती अफवा पसरू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती केली, तसेच सांताक्रुज येथे भाजीपाला असो अथवा जीवनाशक्य वस्तू असो रुग्ण असो याबाबत कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याविषयी सुद्धा त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. व या समाजासमोर महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र पोलिसांनी माणुसकी जोपासत पोलिसांचा एक वेगळा आदर्श उभा केला.
खाकीच्या धाकाची, अथवा ती ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन होते, तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत होता.अत्यावश्यक सेवतील कर्मचारी मात्र कार्यरत आहेत. कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी नेहमीच दिवस-रात्र झटणारे पोलीस आजही देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अविरत काम करताहेत.
यावेळी भटक्या व विमुक्त समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यचे श्री.विकास जगताप म्हणाले की प्रशासनाच्या सेवेमधील निस्वार्थी प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांना या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी भटका विमुक्त संघर्ष समिती व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र यांनी उचललेले पाऊल हे आता केवळ सोहळा नव्हे, तर पोलीस प्रशासन व जनता यांचे संबंध गौरवशाली परंपरा बनू पाहात आहे.
लोकसेवा-समाजसेवा परफॉर्मिंग आर्ट्स, कला, क्रीडा रंगभूमी, मराठी चित्रपट,उद्योग पायाभूत सेवा, राजकारण, प्रशासन (आश्वासक) यातील एकंदर १३ कॅटेगरींसह वैद्यकीय क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या १४ पुरस्कारांच्या व्यतिरिक्त स्पर्धेच्या पलीकडे जाणारे उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलेल्या सहा महनीय व्यक्तींना विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. याचे सर्व महाराष्ट्रातील पत्रकारांकडून व पोलीस प्रशासनाकडून जनतेकडून स्वागत होत आहे.
सदर पुरस्कार सोहळ्याप्रसंगी,
महाराष्ट्र न्यूज9- संपादक नागेश कळसगोंडे
महाराष्ट्र न्यूज9 -उपसंपादक नितीन नगरकर
संघर्ष समितीचे सोशल मीडिया प्रमुख -श्री नितीन चव्हाण
संघर्ष समितीचे सोशल मीडिया उपप्रमुख- श्री मोहन शिंदे
महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष -श्री.गणेश धायडे
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख-श्री किसन चव्हाण.
पुणे जि प्रमुख-विनोद शेगर
सातारा जिल्हा प्रमुख-मंगेश चव्हाण
श्री.मोहन जगताप साहेब सामाजिक कार्यकर्ते तसेच सांताक्रुज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते….
पुरस्काराचे वितरण भटका विमुक्त समाज संघर्ष समितीचे/व पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री विकास जगताप यांनी केले.