👉कोल्हापूर : ग्रा.पं. 194 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक
राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी राज्यातील 4,554 ग्रामपंचायतींच्या 7,130 रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींच्या 194 जागांचा समावेश आहे. या जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यात चंदगड तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमधील ५७ रिक्त पदांचाही समावेश आहे. 22 नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना जारी करतील. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. ७ डिसेंबरला छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल आणि २२ डिसेंबरला मतमोजणी होईल.
👉कोल्हापूर : 'कानवा'मध्ये विकणार अंबाबाईच्या साड्या
▪️ करवीर निवासी अंबाबाई देवीच्या प्रसादाच्या साड्या लवकरच करवीर नगर वाचन मंदिराशेजारील हॉलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतील. त्र्यंबोली टेकडीवर या साड्यांची विक्री कोरोनाच्या काळात नवरात्रीमध्ये मंदिरे पुन्हा सुरू झाल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव गर्दी टाळण्यासाठी केली जात होती; देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले की, बाहेरून येणाऱ्या भाविकांना याची माहिती नसल्याने मंदिर परिसरालगत असलेल्या 'काणवा'च्या हॉलमध्ये प्रसादाच्या साड्यांची विक्री केली जाणार आहे.
👉वर्धापनदिन विशेष: शिवाजी विद्यापीठ 'लोकल टू ग्लोबल'
शिवाजी विद्यापीठाचा आज ५९ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात शिक्षण घेऊन विद्यापीठाचे नाव जगभर पोहोचवले आहे. त्यामुळे स्थानिक शिवाजी विद्यापीठाला आता 'ग्लोबल टच' मिळाला आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य कराराद्वारे शैक्षणिक देवाणघेवाण करण्यात मोठी प्रगती केली आहे. शिवाजी विद्यापीठाचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे