निरानजीक जेऊर गेटजवळ कत्तलीसाठी वासरे घेऊन जाणारी ओम्नी कार युवकांनी पकडली; जेजुरी पोलिसात तक्रार दाखल.!According to the police, the accused Riaz Yusuf Sheikh, 40
निरानजीक जेऊर गेटजवळ कत्तलीसाठी वासरे घेऊन जाणारी ओम्नी कार युवकांनी पकडली; जेजुरी पोलिसात तक्रार दाखल.
प्रतिनिधी-एम एच बारा एफ 8782 या कारमधून चार वासरे वाहून नेण्यात येत होती. तोंडाला व पायाला चिकट टेप लावून अमानुष पद्धतीने याची वाहतूक करण्यात येत होती. हंबीराव मोहिते गोरक्षण संघटनेचे आदेश सोनवणे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी ओमनी कार व आरोपी रियाज युसुफ शेख वय 40 राहणार फलटण कुरेशी मोहल्ला जिल्हा सातारा यास ताब्यात घेतले त्याच्याकडून आठ हजार किमतीची चार वासरे जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुदर्शन होळकर सुरेश गायकवाड पोलीस अमलदार संदीप खरे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर पोलीस मित्र रामभाऊ करण्यावर त्यांनी केली या प्रकरणी पोलिसांनी गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
According to the police, the accused Riaz Yusuf Sheikh, 40, of Phaltan Qureshi Mohalla, Satara district, was arrested in connection with the incident.
सहसंपादक -मोहन भीमराव शिंदे