जुन्या कटु आठवणी दीपावली विशेष खास कविता
*कोरोना आणि दिवाळी*
आनंदाची मुक्तहस्त पणे उधळण करते ही दिवाळी आणि जुन्या कोरोना च्या आठवणीने डोळ्यात येते रोज रोज सकाळी पाणी.
ईवल्या ईवल्या पणत्यांनी उजळून टाकते ही दिवाळी पण दोन वर्ष झाली आमचे कोरूना च्या काळोखातच गेली दिवाळी.
कोरोना येण्याआधी चे जुने गेले-ते-दिवस-राहील्या-त्या-फक्त-आठवणी आणि जुन्या आठवणी किती ठेवणार हो मनात साठवून.
कोरोनाने कितीतरी घराला लावले आहेत टाळे
प्रत्येक घराघरात पसरले आहे कोरोना चे जाळे.
आणि कोरोनाच्या भीतीने लोकांनी मिटले हो डोळे.
जो तो झालाय मोदीचा भक्त
पण गरीबच मेलाय घरातच फक्त
आणि गरिबाचं रस्त्यावर कायम सांडल आहे रक्त.
मोठ्या लोकांना कोरोना झाला तर
त्यांची बातमी येते न्यूज चैनल वर
आणि गोरगरीब मेले रस्त्यावर
त्यांची बातमी का येत नाही वृत्तपत्रावर.
कोरोनाच्या महामारी रोगाणि लोक झाले
आहेत फार त्रस्त
या रोगामुळे डॉक्टर लोकांचा धंदा चाललाय फार मस्त
म्हणून लोकांचे जीव मात्र झाले आहेत स्वस्त
पण कोरूना पेक्षा राजकारण चालल आहे जास्त.
कोरूना ला मारण्याचा लागला आहे आम्हाला ध्यास
कोरोना झाल्यावर घेता येत नाही मोकळा श्वास
म्हणुनच सगळ्यांनी लावा तोंडाला मास्क
नाही तर हाच कोरूना आपल्या जीवनात होईल खूप खास.
गोरगरिबांनो करुणा च्या संकटामध्ये स्वतःला तुम्ही सावरा
नाहीतर मेल्यावर पण आहे आपल्या मड्यावर सॅनिटायझरचाच फवारा आणि फक्त सॅनिटायझरचा फवारा.
दिवाळीच्या गोरगरिबांच्या मनातल्या जुन्या कटु आठवणी
मी कवयित्री नीता प्रवीण भिलारे या कवितेतून मांडलेल्या आहे.
माझ्या भिलारे परिवारातर्फे आपणा सर्वांना दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
कवयित्री- नीता प्रवीण भिलारे