वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...