पत्रकार सुरक्षा समिती चा एलगार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार
सोलापूर :( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती ची सोलापूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) होते या बैठकीत
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
पत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना
यादीवर नसलेल्या वृतपत्र ना शासकीय जाहिराती मिळणेकोरोनामुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला शासकीय मदत व सेवेत समाविष्ट करणे
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी
राज्यातील युट्युब ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे या सह पत्रकारांच्या विविध विषयावर सखोल चर्चा करून राज्य सरकार ला जाग आणण्या साठी प्रखर आंदोलने करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला
पत्रकारांच्या प्रश्नावर प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्य सरकार वर बोचरी टीका केली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला असून
पत्रकारांच्या प्रश्नावर लवकरच राज्यपाल यांची भेट घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी विनंती करणार असल्याचे सांगितले असून पत्रकारांचे प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलने तीव्र करण्याचा सरकार ला इशारा दिला
यावेळी शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार संपर्क प्रमुख लक्ष्मण गणपा सिद्धार्थ भडकुंबे राम हुंडारे विजय चव्हाण रोहित घोडके अक्षय बबलाद इस्माईल शेख प्रसाद ठक्का श्रीनिवास वंगा भागप्पा प्रसन्न युनूस तांबोळी राजमल शिवरात्री श्रीनिवास पेद्दी श्रीनिवास गोरला दत्तात्रय सग्गम इम्तियाज अक्कलकोटकर अबूबकर तांबोळी शेंबज शेख युसूफ पीरजादे अबीद तांबोळी शाहरुख तांबोळी फारूक तांबोळी समीर हुंडेकरी अजित पाथरूटकर इत्यादी उपस्थित होते.