सातारा : ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात, आठ जण जखमी
भरधाव वेगात जात असताना ओमीनी कार ट्रॅक्टरच्या डिस्कला धडकून ओढ्यात आदळली. वाई धोम रोड भोगाव जवळ हा भीषण अपघात झाला. यात आठ प्रवासी जखमी झाले.
वाई (सातारा) - भरधाव वेगात जात असताना ओमीनी कार ट्रॅक्टरच्या डिस्कला धडकून ओढ्यात आदळली. वाई धोम रोड भोगाव जवळ हा भीषण accident झाला. यात आठ प्रवासी जखमी झाले. हा accident काल, शुक्रवारी (दि. 12) रात्रीच्या सुमारास झाला.
वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. ड्रायव्हर सोडून सर्व जण गंभीर जखमी झाले. मारुती ओमीनी कारमधील सर्व प्रवासी वसोळे गावचे रहिवासी आहेत.
ओमीनी भरधाव वेगात जात असताना ट्रॅक्टरच्या डिस्कला धडकून ओढ्यात आदळली. यामध्ये प्रवास करणारे आठ पैकी सात जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रतिनिधी-मोहिनी लोंढे