सहकारात राजकारण आणू नये या मताचे आम्ही आहोत - शंभूराज देसाई
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्ह्यातील प्रमुख नेतेपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, साताऱ्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने या मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
"सहकारात राजकारण आणू नये, असे आमचे मत आहे. आता शिवसेना पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढेल," असे शंभूराज देसाई म्हणाले.
प्रतिनिधी-मोहिनी लोंढे