आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मा .श्री गोविंदजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली टोरंट हटाव आंदोलन तात्पुरते स्थगित.Mumbra-Kalwa- breaking News!
आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष मा.श्री गोविंदजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली टोरंट हटाव आंदोलन तात्पुरते स्थगित.
प्रतिनिधी (ठाणे)-आगरी युवक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री गोविंदजी भगत यांनी दिवा ,मुंब्रा ,कळवा आणि शीळ या भागातील जनतेस असे आवाहन केले आहे की कंपनीचे वीज बिल भरू नये तसेच नवीन मीटर घेऊ नयेत.
त्याचप्रमाणे माननीय श्री गोविंदजी भगत यांनी पत्रकारांशी बोलताना हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल असे सांगितले.
कळवा, मुंब्रा आणि शीळ भागातील वीज वितरण आणि बिल वसुलीचे कंत्राट टोरंटोला दिले होते. मात्र आता ती पुढे ढकलण्यात आली आहे.या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही.परिसरातील वीज बिल वसुली ९० टक्क्यांनी वाढल्याने या भागातील कोणत्याही खासगी कंपनीला कंत्राट देऊ नये, असेही आंदोलकांनी निवेदनात म्हटले आहे.
संपादक -श्री नितीन चव्हाण