मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर ठळक बातम्या-12-12-2021Kolhapur Breaking News

 👉केडीसीसीमध्ये शेवटच्या दोन दिवसांतच अर्ज माघारीची झुंबड

▪️जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मागील चार दिवसांत फक्‍त तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात एकही अर्ज माघार आला नाही. पुढील आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तसेच भाजप आघाडीच्या नेत्यांच्या बैठकी होत आहेत. यानंतरच माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. इच्छुकांचे नेत्यांच्या हालचालीवर लक्ष असून 20 आणि 21 डिसेंबर शेवटच्या दोन दिवसांतच माघारीसाठी झुंबड उडणार आहे.जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी 275 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 226 उमेदवार रिंगणात होते. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत चार दिवसांत फक्‍त तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे.

👉वडगाव बाजार समिती निवडणूक; 6 गटांचे संयुक्‍त पॅनेल

▪️वडगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी कोरे, आवाडे, महाडिक, यड्रावकर, शेट्टी व हाळवणकर या सहा राजकीय गटांच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्‍चित केली आहे. या गटांच्या संयुक्‍त पॅनेलची शनिवारी घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ.विनय कोरे यांनी बैठकीनंतर दिली. वडगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्‍ती पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक वारणा दूध संघाच्या प्रशिक्षण केंद्रात झाली.या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीविरोधात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आ. कोरे, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मोट बांधली.


👉कोल्हापूर : मुलींनो, रोडरोमिओंपासून सावधान!

▪️सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करायचा… गोड गोड बोलायचे…आणि अल्पवयीन शाळकरी मुलींना आपल्या जाळ्यात ओढायच…त्यानंतर जमेल तसं पैसे, दागिने त्यांच्याकडून काढून घ्यायचे… असे प्रकार जिल्ह्यात सर्रास घडत आहेत. यात अल्पवयीन मुलींचे जीवन उद्ध्वस्त होत असून, पालकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे एका चौदा वर्षीय मुलीला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केली जात होती; पण पालक आणि पोलिसांच्या जागरुकतेमुळे पुढील अनर्थ टळला. दानोळीत घटलेले असे प्रकार गावोगावी घडत आहेत.व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांचा सराईतपणे वापर मुले करत आहेत. याचा फायदा घेऊन काही तरुण इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत आहेत.पालकांनी आपल्या मुला—मुलींचे मित्रमैत्रिणी कोण आहेत? त्यांचा शाळेतील वावर कसा आहे? याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या पाल्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण करून त्यांना चांगल्या वाईट प्रसंगी पाठबळ देण्याची, त्यांना आधार देण्याची गरज आहे. पालक जर सजग झाले तर फसवणुकीच्या या प्रकारांना नक्‍कीच आळा बसेल.

👉बालरुग्णांसाठी अत्याधुनिक उपकरणांचा अतिदक्षता विभाग

▪️सीपीआरमध्ये प्रसूतीची चांगली सुविधा आहे. त्यामुळे जिल्ह्यासह अन्य ठिकाणाहून महिला प्रसूती आणि प्रसूतीपूर्व उपचारासाठी येतात. प्रसूतीनंतर काही बालकांना अतिदक्षता विभागाची गरज भासते. उपचार घेणार्‍या बालकांची संख्या, सोयी-सुविधांमुळे रुग्णसेवेत अडथळा येत होता. त्यामुळे अनेक बालकांना उपचारासाठी अन्यत्र हालवावे लागत होते. हे आता थांबणार आहे. सीपीआरमध्ये बालरुग्णांसाठी 20 व्हेंटिलेटरसह अत्याधुनिक उपकरणांचा अतिदक्षता विभाग रुग्णसेवेत येतोय. ऑडिटोरीयम हॉलमध्ये या अतिदक्षता विभागाचा विस्तार सुरू आहे.


👉शिवाजी विद्यापीठास ८५ लाखांचा प्रकल्प मंजूर

▪️महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत शिवाजी विद्यापीठास सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य व केंद्र योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर ‘जिल्हा उत्पन्‍न अंदाज’ तयार करण्याचा 85 लाख रुपयांचा पथदर्शी प्रकल्प मंजूर झाला आहे. हा देशातील पहिलाच प्रकल्प असणार आहे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या ‘सांख्यिकी सक्षमीकरणासाठी सहाय्य’ या केंद्र योजनेंतर्गत मंजूर सामंजस्य करारान्वये राज्यासाठी जिल्हा स्तरावर ‘जिल्हा उत्पन्‍न अंदाज’ करण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व संख्याशास्त्र अधिविभागातील तज्ज्ञांच्या द्वारे शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या प्रस्तावास शासनाच्या नियोजन विभागाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.जिल्हा उत्पन्‍न अंदाज तयार करण्याची कार्यपद्धत विकसित करणे, त्यानुसार प्रथम पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्याकरिता जिल्हा उत्पन्‍न अंदाज तयार करणे व त्यानंतर इतर महसुली विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच जिल्ह्यांचे जिल्हा उत्पन्‍न अंदाज तयार करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग, नंदूरबार, उस्मानाबाद, यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

----------------------------

👉राज्यातील ओमायक्रॉन रुग्णसंख्या १७ वर, मुंबईत जमावबंदीचे आदेश

▪️राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनचे आणखी ७ रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांमध्ये मुंबईतील ३ तर पिंपरी- चिंचवडमधील ४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या धारावीत ओमायक्रॉनने शिरकाव केल्याने मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. दरम्यान, राज्यात ओमायक्रॉनच्या धास्तीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ११ आणि १२ डिसेंबर रोजी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यामुळे वाहनांच्या रॅली, मोर्चे आणि मिरवणुकांना मनाई करण्यात आली आहे.राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये ४८, २५ आणि ३७ वर्षांचे पुरुष आहेत. धारावीत इंदिरानगर येथील एका मशिदीमध्ये टांझानियाहून आल्यापासून हा रुग्ण संशयित होता. त्याला ओमायक्रॉन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. १ डिसेंबरला लंडन येथून आलेल्या एका २५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.


---------------------

*📞 जाहिरातीसाठी संपर्क-8421264592

---------------------

👉आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेचाही पेपर फुटला

▪️आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरात घेण्यात आलेल्या ड गटाच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटला होता. आता गट क च्या परीक्षेचाही पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या गट ‘ड’ आणि गट ‘क’ पदाच्या परीक्षाच राज्य सरकार रद्द ठरविणार का याची चिंता परीक्षार्थींना लागली आहे. पेपरफुटीच्या कटातील मुख्य सूत्रधार महेश सत्यवान बोटले (वय 51) याच्याकडे आरोग्य विभागाची राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई तांत्रिक सहसंचालक म्हणून जबाबदारी आहे. आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणार्‍या गट ‘क’ व ‘ड’ पदाच्या भरती प्रक्रियेत लेखी परीक्षेचा पेपर सेट करणार्‍या समितीत तो सदस्य होता. या दरम्यान 24 ऑक्टोबर रोजी गट ‘क’ची परीक्षा, तर 31 ऑक्टोबर रोजी गट ‘ड’ पदाची लेखी परीक्षा होणार होती.


👉कामासाठी बाराशे कोटींची निविदा; महामार्ग चौपदरीकरन

▪️मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत संगमेश्वर ते लांजा या टप्प्यातील काम पूर्ण करण्यासाठी संबंधित कंपनीला डिसेंबरअखेरपर्यंत नवीन कंत्राटदार नेमण्यासाठी मुदत दिली आहे. त्या कंपनीकडून कार्यवाही झाली नाहीच तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक हजार २०० कोटींची नवीन कामाची निविदाही काढली आहे. त्यामुळे रखडलेल्या या कामाला नवीन वर्षात वेगाने सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

👉राकेश झुनझुनवाला यांनी एका दिवसात कमवले ६ हजार कोटी रुपये, मात्र 'स्‍टार हेल्‍थ' गुंतवणूकदारांची निराशा

▪️राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज आहेत. त्‍यांनी गुंतवणूक गेलेल्‍या स्‍टार हेल्‍थ अँड अलाइड इन्‍शुरन्‍स कंपनी शेअर्सच्‍या मूल्‍यांमध्‍ये घसरण झाल्‍याने गुंतवणूकदार निराश झाले. मात्र झुनझुनवाला यांनी  एका दिवसात तब्‍बल ६ हजार कोटी रुपयांची कमाई केली.राकेश झुनझुनवाला यांची स्‍टार हेल्‍थ अँड अलाइड इन्‍शुरन्‍स कंपनीत १४ टक्‍के भागीदारी आहे. झुनझुनवाला  यांनी प्रति शेअर १५६ रुपयांनी ‘स्‍टार हेल्‍थ’मध्‍ये गुंतवणूक केली होती. ‘स्‍टार हेल्‍थ’च्‍या शेअरचा भाव ९४० रुपये पोहचल्‍याने झुनझुनवाला यांनी एका दिवसात तब्‍बल ६ हजार कोटी रुपयांची कमाई केली.

-----------------------------

👉पुन्हा निर्बंध?; देशातील १० राज्यांना केंद्राचा अलर्ट, ओमिक्रॉनचा धोका असतानाच...

▪️ओमिक्रॉनचा धोका असतानाच देशातील २७ जिल्ह्यांमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसत असल्याने केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी संबंधित राज्यांना अलर्ट केले असून आज तातडीचं पत्र लिहिलं आहे. त्यात स्थितीनुसार नाइट कर्फ्यू व अन्य निर्बंध लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.


▪️देशातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या लक्षात घेता संसर्गाचा वेग कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, त्याचवेळी काही राज्यांत अजूनही रुग्णसंख्या मोठी आहे. त्यातही ठराविक जिल्हे करोनाचे हॉटस्पॉट बनत चालले असून हीच बाब गांभीर्याने घेत केंद्रीय आरोग्य सचिवांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


▪️कोविडची गेल्या दोन आठवड्यांतील स्थिती पाहिल्यास तीन राज्यांमधील ८ जिल्ह्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के इतका झाला असून ७ राज्यांतील १९ जिल्ह्यांत हाच दर ५ ते १० टक्के यादरम्यान राहिला आहे. ही स्थिती पाहता या सर्व २७ जिल्ह्यांबाबत संबंधित राज्यांना आरोग्य सचिवांनी काही निर्देश दिले आहेत. या सर्वच जिल्ह्यांवर बारीक लक्ष ठेवण्यात यावे. समूह संसर्ग आढळल्यात तो भाग कंटनमेंट झोन म्हणून जाहीर करून त्यासंबंधी नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी. त्यात नाइट कर्फ्यू, अधिक लोकांनी एकत्र येण्यावर निर्बंध आणणे, विवाह सोहळा तसेच अंत्यसंस्कार यासाठी उपस्थिती मर्यादा निश्चित करणे, यासारखी पावले तातडीने उचलण्यात यावीत, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.


📌'ती' तीन राज्ये कोणती?


▪️राजेश भूषण यांनी पत्रासोबत संबंधित राज्यांची यादी जोडली आहे. त्यानुसार केरळ , मिझोराम आणि सिक्कीम या तीन राज्यांत गेल्या दोन आठवड्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक राहिला आहे. या राज्यांबाबत अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णसंख्या नेमकी का वाढते आहे, याचा अभ्यासही तातडीने करावा लागणार आहे. देशात करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यानंतर रुग्णसंख्या ३२ वर पोहचली आहे. त्यामुळे धोका वाढत असतानाच दुसरीकडे काही राज्यांत कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली असून त्यासाठीच केंद्राने संबंधित राज्यांना सतर्क केलं आहे.

----------------------------

👉बिनविरोधसाठी प्रत्येकी दोन जागांचा पर्याय! आणि नेत्यांचा करेक्ट कार्यक्रम

▪️कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (District Bank Election) निवडणूक बिनविरोध करण्याच्या द‍ृष्टीने आता पर्याय देण्यात येऊ लागले आहेत. पहिल्या टप्प्यात सर्वांना प्रत्येकी दोन-दोन जागांवर तोडगा काढण्याचा नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते. परंतु, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गेल्या निवडणुकीत ज्या पक्षात एखादी व्यक्‍ती होती त्या व्यक्‍तीने आता पक्ष बदलला आहे. सध्या दुसर्‍या पक्षात या व्यक्‍ती आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्या पक्षाचे सभासद मानायचे, हा कळीचा मुद्दा बनला आहे.


👉आवाडे-भाजपविरोधात महाविकास आघाडी

▪️इचलकरंजी नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांतच लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजप व महाविकास आघाडीच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी इचलकरंजीत राबता ठेवला असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाडेंना बरोबर घेऊन भाजप नगरपालिका निवडणूक लढवणार, असे सूतोवाच केले; तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आवाडे-भाजपविरोधात महाविकास आघाडी, अशी संभाव्य लढत होण्याची चिन्हे आहेत.


👉शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा न दिल्यास स्वबळावर लढणार

▪️शिवसेना महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्ताधार्‍यांनी सन्मानाने जागा द्याव्यात, अन्यथा स्वबळावर बँकेची निवडणूक लढवून आमची ताकद दाखवू, असा इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शनिवारी दिला. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुक शिवसेना उमेदवार व पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली. दुधवडकर म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून जिल्ह्यात पदवीधर, शिक्षक मतदार संघ, गोकुळ दूध संघ आणि नुकत्याच बिनविरोध झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडी म्हणून साथ दिली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सन्मानाने जागा देणे अपेक्षित आहे. एक किंवा दोन जागांवर शिवसेना समाधानी नाही.

👉कोल्हापूर : बिथरलेल्या गव्याने घेतले युवकाचे प्राण

▪️गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर परिसरात धुमाकूळ घालणार्‍या गव्याने आज (शनिवार) एका युवकाचा जीव घेतला; तर इतर दोघांना जायबंदी केले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी रात्री कोल्हापूर शहरातून वडणगेच्या दिशेने गेेलेला गवा शनिवारी एका युवकाचा काळ बनेल असे कुणालाही वाटले नव्हते. परंतु, शनिवारी रात्री भुयेवाडी येथे स्वरूप संभाजी खोत या 19 वर्षीय युवकाला उसाच्या शेतात हल्ला करून ठार मारल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. जखमी दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रल्हाद पांडुरंग पाटील (55) आणि शुभम महादेव पाटील (20) अशी जखमींची नावे आहेत. या प्रकाराने शिये, भुये व भुयेवाडी परिसरात अक्षरशः दहशत पसरली आहे.


👉पीएम नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक


▪️देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पीएम मोदींचे ट्विटर हँडल हॅक करून क्रिप्टोकरन्सी बाबत माहिती देण्यात आली. ही बाब पीएमओच्या लक्षात आल्यावर ट्विटरला माहिती देत पीएमओचे ट्विटर हँडल पुन्हा सुरळीत केल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले. @narendramodi अशा नावाने तयार केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने अधिकृतपणे ५०० BTC विकत घेतले आहे.


👉BitCoin भारतात अधिकृत चलन, थेट मोदींच्या ट्विटरवरून घोषणा

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या ट्विटर हँडलकडे सगळ्याचं कायम लक्ष्य असतं. आठ ते दहा ट्विट्स दररोज त्यांच्या अकाऊंटवरून येत असतात. कधी कधी हा आकडा 20 पर्यंतही जातो. पण मोदींचे ट्विटर अकाऊंट आज मध्यरात्री हॅक झालं. यानंतर सोशल मीडियावर सध्या हा विषय ट्रेडिंग आहे. पण अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरून पहिला मॅसेज बिटकॉईनचा आला. सध्या क्रिप्टो करन्सी बिलवरून संसदेत चर्चा सुरू आहे. याच वेळी मोदींच्या या ट्विटने सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.

👉ओमिक्रॉन नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा ३ कोरोनाबाधितांची नोंद

▪️जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचे सावट आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच शनिवारी (ता.१२) केवळ ३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद शहरात झाली. ग्रामीण भागात बाधितांची नोंद झाली नाही. तर मागील दोन महिन्यांपासून कोरोना मृत्यूचीही नोंद नाही. पंधरा दिवसात ३ बाधितांची सर्वात निच्चांकी नोंद आहे. मात्र आतापर्यंत ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरियंट तपासणीसाठी २० च्या वर नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले, त्यांचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे.

प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...