👉जिल्हा बँक निवडणूक : यादी ठरली... इच्छुक गॅसवर
▪️एक-दोन जागा वगळता सत्ताधारी आघाडीच्या पॅनेलचा आराखडा तयार आहे. शिवसेनेला दोनपेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. आ. विनय कोरे यांचा विरोध मावळण्याची शक्यता आहे. तालुक्यातील 12 जागांवरील उमेदवार ठरलेले आहेत. उर्वरित नऊ जागांवर तडजोड करताना नेत्यांनी भविष्यातील राजकारणाच्या जोडण्या घातल्या आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेसाठी मातब्बर इच्छुकांचा हिरमोड होणार असून, सव्वादोनशे इच्छुक गॅसवर आहेत.
👉हसन मुश्रीफ म्हणतात विनय कोरेंनीच महापालिकेत नगरसेवकांना पैसे दिले मी नाही
▪️कोल्हापूर महानगरपालिकेत ३५-३५ लाख एका नगरसेवकाला वाटल्याचा गौप्यस्फोट आमदार विनय कोरे यांनी केला. यावर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यावर ईडीची चौकशी लावण्याची ही एका संघटनेने मागणी केली आहे. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पत्रकारांशी बोलताना ३५ लाखांबाबत खुलासा केला.महापालिकेत विनय कोरे यांच्यासोबत मी होतो पण पैसे देताना मी नव्हतो, त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता. तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेला, घोडेबाजार थांबविण्यासाठी कोर यांनी पुढाकार घेतला होता. त्याची आठवण त्यांनी सांगितली त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नसल्याचे म्हणत मंत्री मुश्रीफ म्हणाले.
👉कोल्हापुरात आलेला दुसरा गवा अठरा तासांनी शिंगणापुरात
▪️गव्याने कोल्हापूर शहरातून गुरुवारी पहाटे चांगलाच फेरफटका मारला. गुरुवारी रात्री दोन वाजता पितळी गणपतीजवळून बाहेर पडलेला गवा तब्बल 18 तासांनी शिंगणापूरजवळ पोहोचला. सुमारे दीड वर्षे वयाचा हा लहान गवा शहराबाहेर जावा, यासाठी पहाटेपासून सर्व शासकीय यंत्रणा या गव्याच्या मागावर आहेत. या कालावधीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून फिरणार्या या गव्याने नागरिकांना ठिकठिकाणी मनसोक्त दर्शन दिले. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गवा शिंगणापूर येथील चंबुखडी ते बालिंगा (ता. करवीर) या दरम्यान होता.
👉मुलीच्या लग्नाचे वय आता २१ वर्षे!
▪️मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानुसार आता सरकार बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संबंधीचे दुरुस्ती विधेयक संसदेत आणेल. त्यानुसार विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा 1955 मध्ये दुरुस्त्या केल्या जातील. संसदेच्या मान्यतेनंतर या कायद्याला मूर्त स्वरूप येईल. डिसेंबर 2020 मध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने नीती आयोगाकडे यासंदर्भात शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार सरकारकडून मुलींच्या लग्नाचे वय 21 वर्षे करण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे
.