माघारीनंतर 41 उमेदवार रिंगणात; राष्ट्रवादी, भाजपात चुरशीची लढत
सध्या राष्ट्रवादी 13, काँग्रेस 4, भाजप 13, शिवसेना 6, तर अपक्ष 5 असं बलाबल आहे.
खंडाळा सातारा : येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी (Khandala Nagar Panchayat Election) ५० जणांनी केलेल्या दाखल उमेदवारांपैकी नऊ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने ४१ जण निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव व मुख्यधिकारी चेतन कोंडे यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून (NCP) १३, काँग्रेसकडून (Congress) ४, भाजपकडून (BJP) १३, शिवसेनेकडून (Shiv Sena) ६, तर अपक्षाकडून ५ असे बलाबल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे ओबीसी आरक्षण असलेल्या चार प्रभागांत निवडणूक होणार नाही. येथे नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी व भाजपमध्ये दुरंगी लढत होत असून, सर्व १३ प्रभागांत राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार रिंगणात आहे. केवळ चार जागेवर कॉँग्रेस, तर सहा जागेवर शिवसेना लढत देत आहे. काँग्रेसकडून भरलेल्या एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. येथील प्रभाग क्र. १ ,३, ४, व १२ येथे राष्ट्रवादी व भाजप एकमेकासमोर उभे ठाकले आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी, भाजप व अपक्ष अशी लढत होणार आहे. प्रभाग २, ४ व १७ मध्ये भाजप, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने ही आपला उमेदवार उभा केला आहे. यामुळे येथे महाविकास आघाडीची बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादी, भाजप, कॉँग्रेस व शिवसेना यांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहे.
प्रभागानुसार उमेदवार व कंसात पक्ष पुढीलप्रमाणे : प्रभाग एक - पुष्पा दयानंद खंडागळे (राष्ट्रवादी), छाया सूर्यकांत दुधाणे (भाजप), प्रभाग २- शैलेश प्रताप गाढवे(राष्ट्रवादी), राहुल रवींद्र गाढवे (भाजप), गोविंद गोपाळ गाढवे (शिवसेना), प्रभाग ३- सुधीर चंद्रकांत सोनावणे(राष्ट्रवादी), प्रल्हाद विनायक खंडागळे (भाजप) प्रभाग ४- महेंद्र शांताराम गाढवे (राष्ट्रवादी), योगेश अशोक गाढवे (भाजप) व अमोल नामदेव गाढवे (शिवसेना), प्रभाग ५- संदीप रामदास गाढवे (राष्ट्रवादी),दत्तात्रय गोपाळराव गाढवे (भाजप), संतोष भुजंग देशमुख (अपक्ष), प्रभाग ६ - पल्लवी अमोल गाढवे (राष्ट्रवादी), सविता विकास गाढवे (भाजप), प्रभाग ७ - हर्षद सतीश गायकवाड (राष्ट्रवादी), संदीप प्रकाश जाधव(भाजप), सत्यवान संपत जाधव (कॉँग्रेस), दत्तात्रय गुलाबराव खंडागळे (शिवसेना) व अक्षय मधुकर गायकवाड (अपक्ष), प्रभाग ८- नंदा तात्याबा गायकवाड (राष्ट्रवादी), वनिता सुनील संकपाळ (भाजप), विजया जालिंदर संकपाळ (शिवसेना), प्रभाग ११- मोनिका सूरज मोरे (राष्ट्रवादी), स्वाती अभिजित खंडागळे(भाजप), अनुराधा पंकज गायकवाड (कॉँग्रेस), तर अपक्ष म्हणून ज्योती रवींद्र कांबळे, गौरी विजय घाडगे व मोनाली अतुल गायकवाड, प्रभाग १२- रूपाली प्रवीण गाढवे (राष्ट्रवादी), रेखा सुरेश गाढवे (भाजप), प्रभाग १५- शीतल अमित खंडागळे (राष्ट्रवादी), उज्ज्वला बळवंत खंडागळे (भाजप), प्रियंका सूरज मुळीक (कॉँग्रेस), प्रभाग १६- योगेश मोहन संकपाळ (राष्ट्रवादी), पांडुरंग मारुती खरात (भाजप), रत्नकांत आनंदराव भोसले (कॉँग्रेस), प्रमोद दशरथ शिंदे (शिवसेना), प्रभाग १७- उज्ज्वला प्रवीण संकपाळ (राष्ट्रवादी), सुलोचना भीमाजी संकपाळ (भाजप) व अश्विनी प्रवीण शिंदे (शिवसेना) अशी लढत होणार आहे.
प्रतिनिधी-मोहिनी लोंढे