मुख्य सामग्रीवर वगळा

कऱ्हाडला पोलिसांनी पकडला दिड लाखांचा गुटखा

 

कऱ्हाडला पोलिसांनी पकडला 

दिड लाखांचा गुटखा

कऱ्हाड : शहर पोलिसांनी (city police)येथील कोल्हापूर (kolhapur) नाका परिसरातील पोपटभाई पेट्रोल पंप(Petrol pump) चौकात रात्री गस्त घालताना उशिरा गुटख्याची तस्कारी रोखली. त्यात पोलिसांनी तब्बल एक लाख ६० हजारांचा गुटखा (Gutkha)जप्त केला. त्यात दोघांना अटक आहे. प्रसाद अनिल देशमाने (वय २४, रा. सावळेश्वर मंदीराजवळ, पुसेसावळी) आणि आकाश दत्तप्रसाद बाचल (२२, रा. गणपती मंदीराजवळ, पुसेसावळी) अशी त्यांची नावे आहेत. कारवाईत दोन लाखांची कारही जप्त आहे.पोलिसांनी सांगितले की, येथील गुन्हे शाखेचे पोलिस रात्रगस्त घालताना पट्रोलिंग करत होते. यावेळी शहरात नाकाबंदी होती.  त्यावेळी येथील पोपटभाई पेट्रोलपंप शेजारी वाहतुक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार राजू पाटील, पोलिस हवालदार पुजा पाटील, बीट मार्शलचे संग्राम पाटील व दिपक पाडळकर बंदोबस्त करत होते.

त्यावेळी त्यांनी सिल्वर रंगाची ईस्टम कार (एमएच १४ एएम ९०९२) तेथे अडवली हवालदार पाटील यांना त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी कार तपासली त्यावेळी त्यात गुटखा सापडला. कारमधील दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक अमीत बाबर व यांनी विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी तो गुटखा कर्नाटकातून आणल्याचे सप्पष्ट जाले. कारवाईत एक लाख ५९ हजारांचा विमल पानमसाला गुटखा आणि दोन लाखांची कार जप्त केली आहे. कारवाई दरम्यान दोन संशयीत इसमांना अटक करणेत आलेली आहे. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर करत आहेत. गाडीसह पुढील कारवाईसाठी मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शाह यांना कळवले आहे.

सहसंपादक -मोहन भीमराव शिंदे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय (आठवले गट)पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली नायगाव ग्रामपंचायतविरोधात आंघोळ आंदोलन

  पुरंदर (नायगाव)-महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती नसून ओढे-नाले तुडुंब वाहत आहेत, तरी नायगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत गेल्या चार-पाच दिवसांपासून नळातून एक थेंबही पाणी मिळालेले नाही. दरम्यान, नायगावमध्ये मोठ्या उत्साहात सिद्धेश्वर माता जोगेश्वरीचा दसऱ्याचा उत्सव पार पडणार आहे. परंतु गावात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामस्थांना आंघोळीला देखील पाणी उपलब्ध नाही. या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्वप्निल भैय्या पाटोळे, युवक अध्यक्ष, आरपीआय पुरंदर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले जात आहे. या आंदोलनाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून, केवळ ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराविरोधात आहे. ग्रामस्थांकडून सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी पुरंदर यांना पत्राद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. आंदोलन स्थळ: सिद्धेश्वर जोगेश्वरी माता मंदिरासमोर जोपर्यंत गटविकास अधिकारी मॅडम येऊन तोडगा काढत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, अशी नम्र विनंती स्वप्निल भैय्या पाटोळे यांनी केली आहे.

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...