पुणे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात २०६ नवे कोरोना रुग्ण
पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) शनिवारी (ता.१८) दिवसभरात २०६ नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील ९२ जण आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ८६० झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या ही केवळ ९ ने कमी झाली आहे. अन्य दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हे दोनही मृत्यू जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहेत.
शनिवारी दिवसभरात पुणे शहरापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये ४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५८, नगरपालिका हद्दीत दोन आणि कँटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात नऊ कोरोना आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १०० जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३४, जिल्हा परिषद क्षेत्रातील ६६, नगरपालिका हद्दीतील आठ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील चार जणांनी कोरोनावर मात केली आहे.सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ८६० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून ५६२ जणांवर उपचार करण्यात येत आहेत. उर्वरित १ हजार २९८ जण गृह विलगीकरणात आहेत.
प्रतिनिधी- सागर चव्हाण