मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर ठळक बातम्या ९-१२-२०२१Kolhapur breaking News!

 👉कोल्हापूर जिल्हा बँकेचे इच्छुक फोडणार घाम

▪️कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आता २० संचालकांसाठी २२४ उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी गगनबावडा तालुक्यातून दोघांनी माघार घेतली. यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी एकही उमेदवार माघारीसाठी निवडणूक कार्यालयाकडे फिरकला नाही. उमेदवारी संदर्भात आघाडीच्या नेत्यांची बैठकीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच माघारीची प्रक्रिया गती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारीवर अडून बसणारे इच्छुक माघारनाट्यात घाम फोडण्याची शक्यता आहे.जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोमवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत एकूण प्राप्त ३६८ अर्जांपैकी १२३ दुबार अर्ज रद्द करण्यात आले, तर १९ जण अपात्र ठरले होते. मंगळवारी पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली.बँकेच्या निवडणुकीत २२६ उमेदवार रिंगणात होते. मंगळवारी (दि. ०७) पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गगनबावडा तालुक्यातून पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेल्या दोघांनी माघार घेतली.

👉कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे सौंदर्य खुलणार..

▪️प्राचीन स्थापत्याचा आविष्कार असणार्‍या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचे सौंदर्य पूर्ववत खुलणार आहे. कालौघात आधुनिक जमान्यातील संगमरवरी फरशा, ऑईल पेंट व तत्सम प्रकारच्या गोष्टींमुळे मंदिराचे मूळ सौंदर्य झाकोळले आहे. त्यातून मंदिराच्या स्थापत्याची सुटका करण्यासाठीचे प्रयत्न पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने सुरू करण्यात आले आहेत. मंदिरात सन 1990 च्या सुमारास तत्कालीन भाविकांच्या पुढाकाराने संगमरवरी फरशी बसविण्याचे काम करण्यात आले. गरुड मंडपाशेजारी गणेश मंदिरापासून ते देवीच्या गाभार्‍यापर्यंत आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावरील दगडी फरशा, दगडी भिंती व छतासह दगडी नक्षीदार खांबांवर संगमरवरी फरशा बसविण्यात आल्याने मंदिराचा नैसर्गिक गारवा कमी झाला. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भक्‍तांची गर्दी वाढू लागल्याने मंदिरातील तापमानातही वाढ होत गेली.

👉.तर महापालिका निवडणूकही महाविकास आघाडीतर्फे लढूया : राजेश क्षीरसागर

▪️राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आ. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी व भाजपच्या नगरसेविका जयश्री जाधव यांची पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करण्यासाठी भाजपला आवाहन केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आणि एकसंघ आहोत. गोकुळसह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली लढल्या. मग कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या झेंड्याखालीच लढूया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत केले.

👉...तर एसटी कर्मचारी संपावर मार्ग निघू शकतो; चंद्रकांत पाटील

▪️राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळावा, आणि सामान दर्जा मिळावा, अशी एसटी कर्मचाऱ्यांची मूळ मागणी आहे. त्याप्रमाणे ही मागणी सध्या पूर्ण केली तर लगेच संप मिटू शकतो. मात्र, राज्य सरकार निर्णय घ्यायला तयार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पोलिस मुख्यालयात त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले. पाटील म्हणाले की, तुटपुंजा पगार वाढ केली म्हणजे प्रश्न सुटत नाही. त्यांना राज्य सरकारचे कर्मचारी समजण्यात यावे, अशी त्यांची मागणी आहे. जर त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ दिली गेली तर प्रश्न सुटू शकतो.


👉रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात हा घातपात असावा

▪️तामिळनाडूतील कुन्‍नूर वनक्षेत्रात बुधवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी लष्कराचे ‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे १२ अधिकारी होते. पैकी बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत ते एकमेव बचावले. जनरल रावत हे कुन्‍नूर येथे एका कार्यक्रमात सहभागी होऊन सुलूर येथे परतत असताना ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील त्यांच्या अपघाती मृत्यूने देशभर हळहळ व्यक्‍त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार आहेत.रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेला अपघात हा घातपात असावा, अशी शक्यता निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्‍त केली आहे. चीनसारख्या देशाने सायबर हल्‍ला करण्याचा प्रयत्न केला आहे का? हेदेखील पाहावे लागेल. या घातपातामागे असणार्‍या देशाला जशास तसे उत्तर द्यावेच लागेल, असे ते म्हणाले .प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...