👉omicron च्या 14 रुग्णांची नोंद, पाहा देशात एकुण रुग्णांची संख्या किती
▪️देशात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लागण होण्याऱ्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट आता 11 राज्यांमध्ये पसरला आहे. बुधवारी केरळमध्ये ओमायक्रॉनचे चार, महाराष्ट्रात चार, तेलंगणात दोन तर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक असे एकूण 12 रुग्ण आढळले होते. आज कर्नाटकात पाच, दिल्ली आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी चार आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉनचं एक प्रकरण नोंदवलं गेलं आहे. यामुळे देशातील एकूण ओमायक्रॉन संक्रमित लोकांची संख्या 86 वर पोहोचली आहे.
प्रतिनिधी- सागर चव्हाण