श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात
गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अहमदनगरमधील सहकार दौरा संपवून त्यांनी पुण्यात कार्यक्रम घेतले आहेत. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. सध्या भाजपचे नेते राज्यातील सहकार क्षेत्रातील घोटाळ्यांची मालिका वाचून दाखवत असताना केंद्रीय सहकार मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातोय. आज अमित शहा पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. पुणे महानगरपालिका निववडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यालाही ते उपस्थिती लावणार आहेत.
पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात अमित शहा यांनी गणपतीची पूजा केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मंदिरात अमित शहा यांनी गणपतीची पूजा आणि प्रार्थना केली.
संपादक- श्री नितीन चव्हाण