कऱ्हाड पोलिसांची ८४ हजार वाहनांवर कारवाई; सिग्नल तोडणाऱ्यांकडून ४२.३६ लाख वसुली
कऱ्हाड : शहर पोलिस ठाण्याच्या (karad police station)वाहतूक शाखेने वर्षभरात तब्बल ८४ हजार ५३२ वाहनांवर कारवाई करत वर्षात तब्बल एक कोटी ८१ लाख ४१ हजारांच्या दंडाची वसुली केली आहे. जिल्ह्यात(satara district) सर्वाधिक दंड(fine) वसूल झाला आहे. यंदा लॉकडाउनच्या (lockdown)अखेरच्या काळापर्यंत ३० लाखांच्या दंडाची वसुली केली आहे. नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्या सुमारे १५ हजार वाहनधारकांकडून २९ लाख ५२ हजार तर सिग्नल तोडणाऱ्या सहा हजार ४०२ जणांकडून १२ लाख ८४ हजारांच्या दंडाची वसुली पोलिसांनी केली आहे.
शहरात लाखभर वाहनांची आरटीओकडे नोंद(rto registartion) आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या तितकीच आहे. शहरातील वाहतुकीची समस्या जटिल बनलेली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक शाखा(traffic police) स्वतंत्रपणे कार्यरत आहे. सहायक पोलिस निरीक्षक व ४१ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर त्याची जबाबदारी आहे. त्यांना १९ वाहतूक पॉइंटवर नेमण्यात येते. क्रेनवर एक कर्मचारी असतो. शहरातील वाहतूक नियंत्रण करताना दररोज कामाची विभागणी, साप्ताहिक सुट्या, रजा, कार्यालयीन कामाच्या ताळमेळात पोलिसांना तारवेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे पोलिसांची त्या सगळ्यावर नियंत्रण ठेवत दंडाची आकारणीही असते. तरीही वाहतूक शाखा अग्रेसर आहे. एका वर्षात तब्बल ८४ हजार वाहनांवर कावाई करत पोलिसांनी एक कोटी ८१ लाख ४१ हजारांच्या दंडाची वसुली केली आहे.
पोलिसांनी वसुली केलेल्या दंडाच्या २६ टक्के दंड नो पार्किंगमधून, ३० टक्के दंड ट्रीपलशीट व विना हेल्मेट वाहनचालकांकडून तर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दहा टक्के अशी दंडाच्या आकारणी झाली आहे. त्याशिवाय २०० खटले न्यायालयात पाठवून तेथून दंडाची आकारणी केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या ६६ लोकांवर तर रहदारीस अडथळा करणाऱ्या ११७ लोकांवर कारवाई करून त्यांचे खटले न्यायालयात पाठवले आहेत.
प्रतिनिधी-मोहिनी लोंढे