राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता देण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी.Solapur Breaking News
राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता देण्याची पत्रकार सुरक्षा समिती ची मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार मागणी
सोलापूर ( प्रतिनिधी ) कोरोना या महामारी ने जगात देशात व राज्यात हाहाकार माजवला असून या महामारी ला अटकाव व बिमोड करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार यांनी संचार बंदी लॉकडाऊन सारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करून राज्यातील नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असताना राज्यातील पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आरोग्य यंत्रणा यांनी कोरोना बाबत केंद्र सरकार राज्य सरकार चे सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेले आदेश निर्देश सूचना राज्यातील युट्युब व वेब पोर्टल च्या पत्रकार व संपादकांनी राष्ट्रहित समजून आपला जीव धोक्यात घालून सामाजिक बांधिलकी म्हुणुन कुटुंब बाजूला सारून गल्लोगल्ली फिरून वार्ताकण करून जनजागृती बरोबरचं कोरोना बाबत केंद्र सरकार व राज्य सरकार च्या बातम्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम केले असून कोरोना जीवघेणा आजार असल्याचे माहिती असून देखील धाडसाने बातम्या करून फ्रंट वर्करची प्रामुख्याने राज्यातील युट्युब व वेबपोर्टल च्या संपादक व पत्रकारांनी भूमिका बजावली असून राज्यातील युट्युब व पोर्टल ला केंद्र सरकार व राज्य सरकार ची मान्यता नसल्याने पत्रकार विषयी असलेल्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता मिळावी म्हुणुन अनेक वेळा केंद्र सरकार व राज्य सरकार कडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करत असून पुन्हा एकदा पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना राज्यातील युट्युब व वेबपोर्टल ला शासकीय मान्यता देण्यात यावी म्हुणुन स्मरण पत्र सोलापूर चे जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले आहे त्याच बरोबर कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार प्रदेश कार्याध्यक्ष अप्पाशा म्हेत्रे प्रदेश उपाध्यक्ष मल्लिनाथ जळकोटे शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) राम हुंडारे अक्षय बबलाद श्रीकांत कोळी सिद्धार्थ भडकुंबे भागप्पा प्रसन्न श्रीनिवास गोरला नागनाथ गणपा रोहित घोडके सादिक शेख अरुण सीडगिद्दी नागमणी वग्गू सतीश गडकरी डी डी पांढरे राजीव येलगुंटला इत्यादी पत्रकार उपस्थित होते.