सातारा : मराठी माणूस उद्योगात कमी पडतो, या मनोभूमिकेला छेद देत साताऱ्याच्या आैद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मराठी उद्योजकांनी इनोव्हेटिव्ह कल्पना वापरत आपले उद्योग नेटाने उभे करत अनेकांचे संसार उभे करण्याचे काम केले आहे. अशा या सातारच्या मातीत फुललेल्या उद्योजकांच्या कामांची माहिती आम्ही नवीन वर्षात वाचकांसाठी घेऊन येत आहोत दर सोमवारी..
सातारा येथील आद्योगिक वसाहतीत (satara midc)देशाच्या संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिसाईलचे पार्ट बनविणारे उद्योजक आहेत असे कोणी म्हटले तर कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. सातारा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष आणि उद्योजक उदय देशमुख हे मिसाईलचे पार्ट बनवलेत. या ‘मिसाईल मॅन’ने स्मॉल स्केल उद्योगांमध्ये ग्रीन कंपनीच्या मानांकनातील सर्वोत्कृष्ट असा प्लॅटिनम ॲवॉर्ड मिळवून राज्यभरातील लघु उद्योगांमध्ये साताऱ्याचा मानाचा तुरा रोवला आहे.
उद्योजक व ‘मास’चे अध्यक्ष उदय देशमुख यांच्या ४२ वर्षांच्या अविरत व नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या कष्टाला ग्रीन कंपनी या ॲवॉर्डच्या माध्यमातून फळ मिळाले आहे. कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही छोट्या गोष्टीतून होत असते. प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते, आपल्या मुलाने कुठेतरी नोकरी करावी, छोटे घर बांधावे, अशीच श्री. देशमुख यांच्या आई-वडिलांची देखील अपेक्षा होती. परंतु, त्यांचा मोठा भाऊ व वाहिनीने त्यांना व्यवसायात करिअर करण्याचा सल्ला दिला. तो त्यांनी मानला आणि सुरवात झाली देशमुख उद्योग समूहाच्या प्रवासाला.
शिक्षण पूर्ण करून ते कामाला लागले. १९७९ मध्ये वडगाव शेरी पुणे येथे प्रीमियर सील्स या छोट्या कंपनीची स्थापना केली. या कंपनीमध्ये मेटल कॅप्स बनवण्याचे काम केले जात होते. १९८० मध्ये अपोलो इंडस्ट्री सुरू केली. जगाच्या पटलावर आपलं नाव झाले पाहिजे, या ध्येयाने त्यांनी १९८४ पासून सातारा ही आपली कर्मभूमी निवडत कंपनी सुरू केली. अंगभूत कौशल्याच्या जोरावर माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम त्यांच्या काळात मिसाईलसाठी काम करण्याची संधी त्यांना मिळाली.सर्व कंपन्या सौरऊर्जेवरदेशमुख उद्योग समूहातील सर्व युनिट ही सौरऊर्जेवर नियंत्रित आहेत. ही पहिली अशी कंपनी आहे, जी पूर्णतः सौर ऊर्जेवर चालते. त्यासाठी त्यांनी ६.३, १० व १६ किलोवॅाट क्षमतेची सोलर पॅनल बसवले आहेत.वृक्षांची लागवडदेशमुख उद्योग परिसरात विविध प्रकारची ४२ पेक्षा जास्त प्रजातीची फळ आणि फुलझाडे लावली आहेत त्यामध्ये नारळ, आंबा, चिक्कू , रुद्राक्ष, चाफा जमून, आवळा, सुपारी, बेल व इतर फुलझाडे आहेत. उदय देशमुख यांच्यासह सर्व कामगार त्याची नियमित देखभाल करतात त्यामुळे त्यांच्या सर्व युनिटचा परिसर इतरांहून हरित दिसतो.
प्रतिनिधी-मोहिनी लोंढे