पाच लाखाची सुपारी देऊन अपहरण केलेल्या मुलाची सुटका पाच जण अटकेत
अतुल भोसले यांची धडाकेबाज कारवाई
सोलापूर (प्रतिनिधी ) चार दिवसा पूर्वी धोत्री येथून अपहरण केलेल्या आठ वर्षीय मुलाला वळसंग पोलिसांनी सुखरूप नातेवाईकांच्या ताब्यात दिले
नातेवाईकाकडून पाच लाख रुपयाची सुपारी घेऊन अपहरण केलेल्या पाच संशयीताना सांगली बेळगाव येथून अटक करण्यात आली 30 डिसेंबर रोजी सकाळी धोत्री बसस्थानकावरून पृथ्वीराज बिराजदार वय 8 याचे अपहरण झाले होते मुख्य संशयीत धोंडप्पा शेडशाळ ( वय 27 किर्लोस्करवाडी पलूस जिल्हा सांगली ) सराफ व्यवसायिक रमेश बिराजदार (वय 38 रा हल्लूर ता मडोलगी जी बेळगाव ) नितीन उर्फ चार्ली शेडशाळ (रा बाबानगर ता तिकोटा जि विजयपूर, हल्ली रा रामानंद नगर नलावडे मळा पुलूस जि सांगली ) लक्षमण किसन चव्हाण (वय 27 रा लउळ ता माढा जि सोलापूर ) केदार बाळासाहेब शिवपूजे (वय 20 रा कुंडल हायस्कूल पलूस जि सांगली ) अशी अटकेतील संशयीत्यांचे नावे आहेत.
अपहत पृथ्वीराज हा सांगलीतील कुंडल येथे संशयीत केदार शिवपूजे यांच्याकडे मिळाला यातील पाचही संशयीताना कुंडल पलूस हल्लूर येथून ताब्यात घेण्यात आले सराफ व्यावसायिक रमेश बिराजदार याने पाच लाखाची सुपारी दिल्याने मुलाचे अपहरण केल्याची कबुली संशयीत धोंडप्पा शेडशाळ याने पोलिसांना दिली दुसरीत शिकणाऱ्या पृथ्वीराज चे संशयीतांनी अपहरण केले होते या बाबत वळसंग पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद देण्यात आली होती त्याच्या शोधासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षण अतुल भोसले यांनी पाच पथके तयार करून विविध ठिकाणी पाठवली सांगली येथे अपहत मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर सर्व संशयीतांच्या मुसक्या आवळल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्यासह पथकाचे कौतुक केले असून ग्रामस्थानी पोलिसांचा सत्कार केला.
सहसंपादक -मोहन भीमराव शिंदे