कोल्हापूर : ३१९ कोटींच्या बिलांचा भरणा होणार ऑनलाईन
कोल्हापूर : आठ महिन्यांत कोल्हापूर(kolhapur) परिमंडळातील वीज ग्राहकांनी ३१९ कोटी रुपयांच्या बिलांचा ऑनलाईन भरणा केला. राज्यातील ७६ टक्के बिलांचा(light bill) भरणा ऑनलाईन झाला असून, ऑनलाईनद्वारे ३५ हजार ४५३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. डिजिटल सेवा उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी कॅशलेस बिल(casshless payment) भरण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. उच्चदाब वीज ग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय असून, ते अनिवार्य आहे. त्यामुळे महावितरणच्या(msedcl ) २० हजार ८७४ उच्चदाब वीज ग्राहकांकडून दरमहा सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा भरणा त्याद्वारे होत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत एक लाख ६२ हजार ३४१ उच्चदाब ग्राहकांनी २२ हजार ६६४ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाइनद्वारे केला. त्यामुळे धनादेश बाउन्स(cheque bounce) होणे, तो वटण्यास उशीर होणे किंवा अन्य अडथळे पूर्ण दूर झाले आहेत.
महावितरणने(mahavitran) सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सर्व प्रकारची सेवा डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्या आहेत. लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in हे संकेतस्थळ व मोबाईल अॅप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र पोर्टलची सोय आहे. दरमहा वीज बिलांचा भरणा ऑनलाईन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहक सेवा देखील लघु व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
बिल भरण्याचे प्रमाण वाढलेसद्यस्थितीत एकूण वीज बिलांच्या रकमेपैकी तब्बल ७६ टक्के रकमेचा दरमहा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाईनचा पर्याय निवडला आहे, तर आठ महिन्यांत एकूण ३५ हजार ४५३ कोटी रुपयांच्या (७५.६ टक्के) बिलांचा सुरक्षित व सोयीनुसार ऑनलाइन भरणा केला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये ४ हजार ६३६ कोटी रुपयांचा (७६ टक्के) भरणा करून ऑनलाईन सेवेचा लाभ घेतला होता.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे