कोल्हापूर : 480 ग्रामपंचायतींत धुरळा!
✒️जिल्ह्यातील 480 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला आहे. या ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. महापालिका, नगरपालिकांपाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम सुरू झाल्याने यंदाचे वर्षे निवडणुकीच्या धामधुमीचेच ठरणार आहे. दि. 25 मार्च रोजी जिल्हाधिकारी ही प्रभाग रचना अंतिम करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाHनेवारी 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत निवडणुका न झालेल्या 5 आणि जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या 475 अशा एकूण 480 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार सर्व तहसीलदारांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील निवडणूक होत असलेल्या गावांची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर केली. या प्रभाग रचनेवर दि. 25 फेHब—ुवारी ते दि. 4 मार्चपर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.
👉देशातील आजवरचा सर्वांत मोठा 'IPO', ६५०० कोटी रुपयांचे समभाग खरेदी करण्याची संधी
✒️देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी 'एलआयसी' 'आयपीओ' आणण्याच्या तयारीत आहे. सूत्रांHच्या मते हा 'आयपीओ' १० मार्चला गुंतवणूकदारांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 'एलआयसी'तर्फे नुकताच तसा अर्ज 'सेबी'कडे सादर करण्यात आला. त्या विषयी बहुसंख्य ग्राहकांची 'एलआयसी'ची पॉलिसी मध्येच बंद होते. त्याची कारणे अनेक आहेतH. वेळेवर प्रीमियम न भरल्यास किंवा तिचे नूतनीकरण न केल्यास पॉलिसी बंद होण्याची शक्यता असते. अशा बंद झालेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी 'एलआयसी'तर्फे दिली जाते. हल्लीच 'एलआयसी'तर्फे पाच वर्षांपासून बंद असलेल्या पॉलिसी Hशुल्क भरून चालू करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
👉कोल्हापूर : नगरपालिकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
✒️नगरपालिकांच्या निवडणुकांत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. या निवडणुकांत स्थानिक विकास आघाड्यांचाच बोलबाला असला, तरी त्याआडून नेते आपल्या सोयीचे किंवा कार्यकर्त्यांच्या सोयीने राजकारण करतात. त्यामुळे नेत्यांचा सहभाग व त्याआडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. इचलकरंजी नगरपालिकेत भाजपकडे नगराध्यक्षपद होते. तर सभागृहात संमिश्र सत्ता होती. आता तेथे चुरशीचा सामना आहे. आ. प्रकाश आवाडे यांचा ताराराणी पक्ष आहे. ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. भाजपचे तत्कालीन आ. सुरेश हाळवणकर यांचा पराभव करून ते निवडून आले. तेथे भाजपमध्येच जुना-नवा असा वाद आहे. या निवडणुकीत आ. आवाडे कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांचे समर्थक भाजपच्या चिन्हावर लढणार की मूळ भाजपवाले त्यांना बाजूला ठेवणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
👉कोल्हापूर : विंचवाच्या नवीन प्रजातीचा शोध
✒️जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वाघझीरा व खिरोदा या गावात विंचवाची नवीन प्रजातीचा शोध लागला आहे. नवीन प्रजाती ही बुथीडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या संशोधकांनी ही कामगिरी केली.सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आढळलेल्या या प्रजातीचे नाHमकरण ’कॉमसोबुथस सातपुराएनसीस’ असे केले आहे. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या 50 प्रजाती आढळून येतात. भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहिली प्रजाती आहे. संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापूर) आणि अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा सहभाग आहे.
प्रतिनिधी- स्नेहा डोईफोडे