मुख्य सामग्रीवर वगळा

जनजागृति सप्ताह निमित्त वनवा संबंधित संवेदनशील गांवांमध्ये वनविभागामार्फत विविध उपक्रम घेतले.कोयना वन्यजीव वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली! News

 दिनांक 01/2/22 ते 07/02/2022 या सप्ताह मध्ये सह्याद्रि व्याघ्र राखीव अंतर्गत कोयना वन्यजीव बफर क्षेत्र कुसवड़े परिमंडळ आणि कोयना परिमंडळ मध्ये वनवणवा प्रतिबंध जनजागृति सप्ताह निमित्त वनवा संबंधित संवेदनशील गांवांमध्ये वनविभागामार्फत विविध उपक्रम घेतले.

कोयना वन्यजीव वनक्षेत्रपाल श्री.संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली वनरक्षक रोहन माने, प्रशांत भोसले, आकाश धवणे, संजय ऐवळे, पार्वती सरगर , सचिन पाटील आणि निसर्ग मार्गदर्शक अनिल बोधे,निलेश फुटाणे, सुशांत शिंदे इ.नी कारवट, घानबी, वाटोळे ,कोयना, रासाटी, मिरगाव, नवजा, पद्मावती माध्यमिक  विद्यालय (काटी) ,अवसरी, वन कुसवडे,  गावडेवाडी, धुईलवाडी, खुडुपले,वाडीया गावांमध्ये जाऊन ग्रामस्थ, सरपंच,शिक्षकवृन्द आणि शाळेतील विद्यार्थी यांच्या उपस्थिति मध्ये वनवा बाबत माहिती देऊन विविध जनजागृतिपर चित्रफित दाखविन्यात आली. 

तसेच वणवा माहीतीपत्रके वाटण्यात आली.चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी उत्फुर्त सहभाग दाखवून वनवनवा लागणार नाही किंवा अशी घटना घडली तर तात्काळ गावपातळीवर सहकार्य करुन वनवा विझवन्यायासाठी प्रयत्नशील राहन्याचा खंबिर विश्वास व्यक्त केला.वनविभागामर्फ़त आयोजित वनवनवामुक्त गांव स्पर्धेत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार सर्व गावातील गावकरयानी व्यक्त केला.तसेच या वनवा प्रतिबंध सप्ताह अंतर्गत अनेक उपक्रम  गावांमध्ये घेतले गेले.

सहसंपादक - मोहन भीमराव शिंदे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्या-विमुक्तांसाठी भैरव संघर्ष — विजय जाधव यांची प्रेरणादायी वाटचाल

वीस वर्षांचा संघर्ष हजारो कुटुंबांना नवी ओळख पुणे — भटक्या आणि विमुक्त समाजाच्या जीवनात ओळखपत्रे, शिक्षण, रोजगार आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत समाजाला दिशा देणारे आणि त्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जय भैरवनाथ सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजय जाधव. वीस वर्षांची सक्रिय वाटचाल गेल्या दोन दशकांपासून जाधव समाजकार्यात सक्रीय असून भाषणापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून बदल घडवण्यावर त्यांचा भर आहे. लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जिल्ह्यापासून राज्यपातळीपर्यंत समाजाचा प्रश्न पोहोचवला आहे. "समाजाने दिलेले प्रेम हेच माझे खरे बळ" असे ते नेहमी सांगतात. १५०० कुटुंबांना जातीचे दाखले अलीकडील उपक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली १५०० भटक्या-विमुक्त कुटुंबांना जातीचे दाखले मिळाले. हा केवळ कागदाचा तुकडा नसून — शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सरकारी योजनांची दारे खुली करणारी सुवर्णकिल्ली ठरली. महसूल विभाग, जिल्हा प्रशासन, पोलिस खातं ...

"अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाठपुराव्याला यश!"

अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश; महामंडळाच्या नावात बदलास शासनाची अधिकृत मंजुरी मुंबई | ४ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे अखिल भारतीय नाथपंथी समाज संघर्ष समिती व अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. पूर्वीचे नाव “परमपुज्य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ” हे आता बदलून “श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ” असे करण्यात आले आहे. 📍 १७ जुलै २०१५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नावे बदलण्यास मंजुरी, आणि ४ ऑगस्ट २०१५ रोजी शासनाने शुद्धिपत्रक जारी करून निर्णय अंमलात आणला. संघर्ष समितीचा निर्णायक पाठपुरावा या ऐतिहासिक निर्णयासाठी संघर्ष समितीने शासन दरबारी सातत्याने ठोस भूमिका मांडली. समाजाच्या अस्मितेसाठी आणि स्वतंत्र आर्थिक ओळखीच्या मागणीसाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. नेतृत्वाचे मोलाचे योगदान या लढ्याच्या यशामागे अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ , (एसीपी नि.) श्री. मछिंद्र बाबुराव चव्हाण , सौ. ...

समाजासाठी झुंजणारा, दबावाला न झुकणारा – नेता असावा तर असा श्री विजयकाका गायकवाड

सातारा जिल्हा ही प्रेरणादायी भूमी जिथून श्री विजयकाका गायकवाड यांनी लोक जनशक्ती पार्टीचे म्हणून आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात केली. ही केवळ पदाची नेमणूक नसून, "गोर-गरीब, भटक्या-विमुक्त समाजासाठी मदतीचा हात पुढे करणारे आणि सातत्याने त्यांच्या प्रश्नांवर काम करणारे श्री विजयदादा गायकवाड " सर्व उपेक्षितांचे बुलंद प्रतिनिधी साताऱ्याची भूमी ही लढ्यांची, क्रांतीची आणि परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतून उभे राहिलेले श्री विजयकाका गायकवाड हे भटक्या-विमुक्त, दलित, श्रमिक, महिला आणि तरुण समाजघटकांचे खरे प्रतिनिधी आहेत. ते फक्त वंचितांचे नव्हे, तर सर्व बहुजनांचे बुलंद व्यासपीठ बनले आहेत. साताऱ्याचा वाघ – बेधडक, निर्भीड, तडफदार श्री विजयकाकांचे नेतृत्व हे संयमित, पण अत्यंत ठाम आणि आक्रमक आहे. ते कोणत्याही अन्यायापुढे झुकत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यात आणि कृतीत साताऱ्याच्या भूमीचा आत्मविश्वास आणि वाघासारखी तडफ दिसते. “मी पक्षासाठी नव्हे, समाजासाठी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.” – श्री विजयकाका गायकवाड भटक्या-विमुक्त आणि दलित समाजासाठी ठोस...